शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

शेतकऱ्याच्या कन्येचा नेमबाजीत डबलबार!

By admin | Updated: February 6, 2015 00:44 IST

मलकापुरात आनंद : राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण, एक कास्य पदक

मलकापूर : राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेत मलकापूरच्या पूजा थोरातने ४०० पैकी ३९४ गुण मिळवत सुवर्ण पदक व २१ वर्षांखालील स्पर्धेत कास्यपदक मिळविले. शेतकऱ्याच्या कन्येने मिळवलेले हे यश उल्लेखनीय असेच आहे.नॅशनल रायफल असोसिएशनच्या वतीने चौथ्या ‘गन आॅफ ग्लोरी’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ पूजा कुबेर थोरात ही येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे़ तिने या स्पर्धेत दहा मीटर वीपसाईड एअर रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच सहभाग घेतला होता़ देशातील विविध राज्यांतून आलेल्या १८ वर्षांखालील स्पर्धकांवर मात करत तिने ४०० पैकी ३९४ गुण मिळविले. या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले. तर याच प्रकारात २१ वर्षांखालील खेळाडूंमध्ये तिने कास्यपदकही पटकाविले़ घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने घराच्या हॉलमध्येच सराव करून तिने हे राष्ट्रीय पातळीवरील यश मिळविले.या यशाबद्दल मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पी़ जी़ पाटील, बी़ बी़ पाटील, तुळशीराम शिर्के, वसंत चव्हाण, आऱ आऱ पाटील, ए़ एऩ शिर्के, शिवाजीराव थोरात, जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल राजपुरोहित यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. क्रीडा प्रशिक्षक सारंग थोरात यांचे तिला मार्गदर्शन लाभले़ (प्रतिनिधी)चांगल्या साधनांची आवश्यकतामलकापूरसारख्या निमशहरी भागातील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत कऱ्हाडसह राज्याचे नाव उज्ज्वल करीत आहे़ मात्र, या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यासाठी तेवढ्याच उच्च तंत्रज्ञानाच्या साधनांची अवश्यकता आहे़ त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने व सक्षम व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे़ प्रतिकूल परिस्थिती असतानाही या महागड्या खेळासाठी पालकांनी गन व पॅलेट जर्मनवरून उपलब्ध केले आहे़ अभ्यास सांभाळत योगासन, व्यायाम करणे व घराच्या हॉलमध्येच दररोज चार तास सरावाचे सातत्य राखल्यामुळे हे यश मिळविले़ यापुढील काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे़ - पूजा थोरात