शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

प्रतिष्ठेच्या लढतीत आता अपक्षांची भर !

By admin | Updated: July 31, 2015 21:22 IST

तारळे ग्रामपंचायत धूमशान : देसाई-पाटणकर गट आमने-सामने; उमेदवारांकडून बेरजेचे राजकारण

एकनाथ माळी - तारळे -देसाई-पाटणकर गटांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या तारळे ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नेते, उमेदवार, कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून प्रचारात गुंतले आहेत. प्रत्यक्ष मतदारांच्या घराघरांत जाऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न सुरू आहे. गुप्त बैठका झडत आहेत. प्रत्येकजण भाऊबंदकीच्या बेरजेच्या राजकारणात गुंतला असून, बेरजेच्या राजकारणात प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत आहे. पंधरा उमेदवार असणाऱ्या तारळे ग्रामपंचायतीमध्ये यंदा एक नवीन वॉर्ड वाढून सतरा सदस्य सहा वॉर्डातून निवडून येणार आहेत. गेले अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर देसाई गटाची सत्ता अबाधित होती. गतवेळी पाटणकर गटाने ग्रामपंचायत ताब्यात घेत देसाई गटाला अनपेक्षित धक्का दिला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी देसाई गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान पाटणकर गटासमोर असून, दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतीवर ताबा सांगण्यात येत आहे. अनेक कारणांनी ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. उमेदवार निवडताना बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न झाले असले तरी यंदा अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने फायदा कुणाला व तोटा कुणाला, हे थोड्याच दिवसांत समोर येईल. अपक्षांमुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी तरुण नेतृत्वाला वाव दिल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुणांची फौजच निवडणूक प्रचारात सक्रिय झाली आहे. रात्री उशिरापर्यंत प्रचारात विविध विषय चर्चेत येत आहेत. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विविध कारणांनी प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार, कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत.भाऊबंदीकीवरच प्रचाराचा जोर...भाऊबंधकीवरच प्रचाराचा जोर आहे. उमेदवार देताना दोन्ही गटांनी बंडखोरी टाळण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला असला तरीही वॉर्ड नं. तीनमध्ये देसाई गटातील दोन इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक गुंतागुंतीची झाली आहे. मतदार कुणाला कौल देतात, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.