दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, दिल्ली अशा सहा हजार किलोमीटरच्या सद्भावना दौडदरम्यान त्यांचे कऱ्हाड शहरात आगमन झाले. त्यावेळी कऱ्हाड जिमखाना संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, सचिव सुधीर एकांडे, विवेक ढापरे, सुचिता शहा, विवेक कुंभार, सचिन गरुड, प्रमोद गरगटे, अभिजित घाटगे, दीपक शहा, शंकर चव्हाण, डॉ. चिन्मय विंगकर, आदींची उपस्थिती होती.
यावेळी विवेक ढापरे यांनी जिमखान्याच्या कार्याचापरिचय करून दिला. रणजी सामने, संगीत महोत्सव, मराठी साहित्य संमेलन, बॅडमिंटन, टेबल टेनिस मॅचेस, इत्यादी अनेक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. सुफिया यांनी यापूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी, इंडिया गेट दिल्ली ते गेटवे ऑफ इंडिया, दिल्ली-आग्रा-जयपूर-दिल्ली अशा दौड विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज बुकमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
सध्याची दौड त्या रोज ५५ किलोमीटर अंतर धावून १३५ दिवसांत पूर्ण करणार आहेत. सायकलपटू असलेले त्यांचे पती विकास या दौडीचे नियोजन त्यांच्यासोबतीने करीत आहेत.
डॉ. चिन्मय विंगकर यांनी प्रास्ताविक केले. अभिजित घाटगे यांनी आभार मानले.
फोटो : २९केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड येथे जिमखाना संस्थेच्या वतीने विख्यात धावपटू सुफिया यांचा संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.