शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

अवकाळीने आणली स्ट्रॉबेरी उत्पादकांना अवकळा! राज्यात १५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:13 IST

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे.

ठळक मुद्देसततचा पाऊसही कारणीभूत । ६० टक्के मालाचे नुकसान, यावर्षी १४ हजार टनच उत्पादन

नितीन काळेल।सातारा : सततच्या आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी राज्यातील साडेतीनपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे पीक संपले आहे. त्यामुळे ४० टक्केच उत्पादन हाती येणार असून, त्यालाही दर्जा नसेल. परिणामी, दरही मिळणार नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक कोलमडणार आहेत. त्यातच दर वर्षी सुमारे ३० हजार टन उत्पादन होते. यंदा ते १२ ते १४ हजार टन होऊन उत्पादकांना १५० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात राज्यात सर्वांत अधिक स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. ब्रिटिश आल्यापासून येथे स्ट्रॉबेरी घेतली जाते. पूर्वी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र थोडे होते; मात्र १९९४नंतर क्षेत्राचा विस्तार झाला. सद्य:स्थितीत राज्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र अंदाजे साडेतीन हजार एकर असून, सातारा जिल्ह्यात ते तीन हजार एकरांवर आहे. तर, एकट्या महाबळेश्वर तालुक्यात दोन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी होते. म्हणजेच अर्ध्यापेक्षा अधिक उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यातच होते.

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. स्ट्रॉबेरी थंड हवामानाच्या भागात होत असल्याने दर वर्षी ५० एकरांपर्यंत कमी किंवा जास्त क्षेत्र निर्माण होते. या वर्षी हे क्षेत्र थोडेस वाढले; पण टिकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कारण म्हणजे सततचा आणि अवकाळी पाऊस.

  • राज्यात पाच महिने पाऊस राहिला. त्यामुळे साडेतीन हजारांपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ६० टक्के फळे वाया गेलीत.

 

  • 100 या स्ट्रॉबेरीची वार्षिक उलाढाल २०० ते २५० कोटींची आहे. या वर्षी कशीबशी १०० कोटी रुपयांचीच उलाढाल होऊ शकते. त्यातून केलेला खर्चही काढणे अवघड आहे. एकंदरीतच, स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन नाही. आहे त्या मालाला दर्जा नाही. आताच दर पडलेत, ते वाढणे अवघड आहे. त्यामुळे अशा स्थितीतून पुन्हा उभारी घेणे उत्पादकांना सहजासहजी शक्य नाही.

 

 

स्ट्रॉबेरी हा नाशवंत माल आहे. यावर प्रक्रिया होणे महत्त्वाचे असते. उत्पादन वाढले तर विक्री होणे आवश्यकच असते. त्यामुळे उत्पादकांना थेट विक्रीला परवानगी मिळावी. तसेच या वर्षी सततच्या आणि अवकाळी पावसामुळे ६० टक्के क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. सर्वांत महागडे हे फळ असून, आताच्या नुकसानामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या फळाला विम्याचे कवच देण्याची खरी गरज आहे. - बाळासाहेब भिलारे

 --अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन आॅफ इंडिया

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारRainपाऊस