शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोची लाली उतरली; ४० रुपये किलो; महिन्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:04 IST

कांदा महाग होत चालला

सातारा : सातारा शहरात महिन्यानंतर टोमॅटोची लाली उतरली. बाजार समितीत किलोला २० ते ३० रुपये दर मिळाला. त्यामुळे मंडईत किलोचा दर ४० पर्यंत खाली आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर कांदा महाग होत चालला आहे. बाजार समितीत क्विंटलला २६०० पर्यंत भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून आले.सातारा बाजार समितीत दररोज पालेभाज्या, फळभाज्यांची मोठी आवक होते. तसेच फळेही येतात. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातच रविवारी अधिक प्रमाणात शेतमाल येतो. या रविवारी ६०० क्विंटल फळभाज्यांची तर कांद्याची ३८९ क्विंटलची आवक झाली. तर आले १२ क्विंटल आले होते. बाजार समितीत कांद्याची आवक चांगली असून, दरात वाढ झाली आहे. रविवारी कांद्याला क्विंटलला २०० पासून २६०० पर्यंत दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सातारा बाजार समितीत वांग्याच्या दरात आणखी उतार आला. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. तर टोमॅटोला १० किलोला २०० ते ३०० रुपयेच दर मिळाला. मागील रविवारी ३०० ते ६०० रुपये भाव मिळाला होता. टोमॅटोचा दर निम्म्याने कमी झाला आहे. भाजी मंडईतही दरात उतार आल्यामुळे एक महिन्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. फ्लाॅवरचा दर स्थिर राहिला आहे. त्याचबरोबर आले दरात थोडा उतार आला आहे. रविवारी आल्याला क्विंटलला ८ हजारांपासून ११ हजारांपर्यंत दर मिळाला. तर लसणाचा दर स्थिर असून, क्विंटलला ८ ते १४ हजारांपर्यंत दर आला. त्याचबरोबर वाटाण्याचा दर कमी झाला आहे. क्विंटलला तीन ते साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. गवारचा दर स्थिर आहे. रविवारी गवारला क्विंटलला ३ ते ४ हजार दर आला. तर पावट्याला क्विंटलला साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला.

शेवगा शेंग स्थिर...सातारा बाजार समितीत शेवगा शेंगचा दर स्थिर आहे. क्विंटलला तीन हजारांपर्यंत दर आला. तर कारले आणि दोडक्याचा भाव कमी झाला आहे. कारल्याला १० किलोला अवघा १०० ते २०० आणि दोडक्याला १५० ते २५० रुपये दर मिळाला. तसेच बटाट्याला १० किलोला १३० ते १६० रुपये दर आला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३०० ते ४०० रुपये दर आला. मिरची दरात थोडा उतार आला आहे तर ढब्बूही स्वस्त झाला असून, २०० ते ३०० आणि भेंडीला १५० ते २५० रुपये दर मिळाला. काकडीही स्वस्त झाली असून, १० किलोला अवघा ५० ते ८० रुपये दर मिळाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर