शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तरूणाकडे सापडल्या बनावट नोटा; पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू

By दत्ता यादव | Updated: December 26, 2022 19:34 IST

एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणाकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सातारा : एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणाकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नोटा संबंधित युवकाने कोठे तयार केल्या कीकोणी त्याला दिल्या, हे अद्याप समोर आले नसून पोलिस त्याच्याकडे कसून चाैकशी करीत आहेत.

शेखर नानासाहेब थोरात (वय २९, रा. चंदननगर, कोडोली सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गालगत असलेल्या डीमार्टजवळील ब्रीजजवळ एका तरूण येणार असून, त्या तरूणाकडेबनावट नोटा असल्याची माहिती स`थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हवालदार गणेश कचरे यांना कारवार्इच्या सूचना दिल्या. रविवारी दुपारी १२वाजता शेखर थोरात हा तेथे आला असता गणेश कचरे यांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या. त्याला स`थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने या नोटा स्वत:हून छापल्या आहेत की अन्य कोणाकडून घेतल्या आहेत, हे अद्याप त्याच्या चाैकशीतून समोर आले नाही. पुढील तपासासाठी त्याला सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२८ पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे अधिक तपास करीत आहेत.  

 ‘त्याने’ होमगार्ड म्हणूनही काम केलयं

शेखर थोरात याने यापूर्वी काही वर्षे होमगार्ड म्हणून काम केले होते. तसेच सध्या तो साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहे. त्याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे. अशी एकंदरीत त्याची पार्श्वभूमी असताना त्याने या नोटा कोठून आणल्या, हे मात्र, गुलदस्त्यातच आहे.

नोटा खपविण्यासाठी तो सायंकाळी घराबाहेर पडायचा

शेखर थोरात हा कोडोली चंदननगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्याच्याजवळ असलेल्या बनावट नोटा तो खपविण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडायचा. या नोटा त्याने विशेषत: कोडोली, चंदननगर परिसरातच खपविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. रात्री या नोटा देऊन तो बऱ्याच वस्तू खरेदी करायचा. 

 पोलिस पोहोचणार मुळापर्यंत...

शेखर थोरात याने या बनावट नोटा कोठून आणल्या, हे तपासण्यासाठी पोलिस मुळापर्यंत तपास करणार आहेत. त्याच्या मोबाइलचे काॅल डिटेल्स, त्याचे मित्र कोण, कोणत्या दुकानात त्याने या नोटा खपवून वस्तू खरेदी केल्या. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात आले येणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस