चोरट्यांनी हिसकावले नकली नेकलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:38 IST2021-01-25T04:38:44+5:302021-01-25T04:38:44+5:30

सातारा : यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर हॉलकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवर थांबलेल्या दोन अनोळखी युवकांनी एका महिलेच्या गळ्यातील नेकलेस हिसकावून पलायन ...

Fake necklace snatched by thieves | चोरट्यांनी हिसकावले नकली नेकलेस

चोरट्यांनी हिसकावले नकली नेकलेस

सातारा : यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर हॉलकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवर थांबलेल्या दोन अनोळखी युवकांनी एका महिलेच्या गळ्यातील नेकलेस हिसकावून पलायन केले. चोरट्यांनी पळवून नेलेला नेकलेस नकली होता. तरीसुद्धा संबंधित महिलेने शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, अनुराधा सचिन गाडे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि त्यांच्या सासू या बागवान चौक ते सुपनेकर हॉल या रस्त्याने पायी चालत निघाल्या होत्या. त्या यादोगोपाळ पेठेत एका घराजवळ आल्या असता तेथे एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अनोळखी मुले बसलेली त्यांना दिसून आली. यापैकी मागे बसलेल्या मुलाने अनुराधा यांना जोराने धक्का मारत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले आणि बागवान चौकाकडे पलायन केले.

Web Title: Fake necklace snatched by thieves