नव्या रुग्णवाहिकेमुळे मसूरकरांची सोय : जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST2021-07-18T04:27:38+5:302021-07-18T04:27:38+5:30

मसूर : ‘मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मसूर व परिसरातील रुग्णांची आरोग्याची चांगली सोय झाली आहे,’ ...

Facilities for lentils due to new ambulance: Jagdale | नव्या रुग्णवाहिकेमुळे मसूरकरांची सोय : जगदाळे

नव्या रुग्णवाहिकेमुळे मसूरकरांची सोय : जगदाळे

मसूर : ‘मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मसूर व परिसरातील रुग्णांची आरोग्याची चांगली सोय झाली आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, प्रा. कादर पिरजादे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, विक्रांत शिंदे, विकास पाटोळे, सिकंदर शेख, तात्या पाटोळे, सचिन जगदाळे, कासम पटेल व मसूरचे ग्रामस्थ व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

फोटो १७मसूर-अॅबुलन्स

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : जगन्नाथ कुंभार)

Web Title: Facilities for lentils due to new ambulance: Jagdale