शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आॅनलाइन खरेदी वाढूनही फुकट हमाली!

By admin | Updated: August 27, 2015 22:58 IST

कुरिअर अडचणीत : ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात काम वाढलं; पण धंदा बुडाला

जगदीश कोष्टी- सातारा प्रत्येक गावात चांगली बाजारपेठ, मोबाईल दुकानं असूनही आजची तरुणाई कपडे, शुज, मोबाइलपासून ते टीव्ही, फ्रिज आॅनलाइनच खरेदी करते. कुरिअरमुळे या वस्तू घरपोच मिळत असले तरी कुरिअर कंपन्या जवळजवळ फुकटच हमाली करत आहे. या वस्तू परत पाठवायच्या असतील तरच मोबदला मिळतो. पंजाबमधून भला मोठा शस्त्रसाठा भुर्इंजमध्ये आला. हव्या त्या व्यक्तींना तो मिळालाही; पण त्याची कानकुणही कोणाला लागली नाही. शस्त्रं अन् तेही चक्क कुरिअरने येऊ शकतो, हे समजल्यावर समाजातील प्रत्येक घटकाच्या भुवया उंचावल्या. एवढी बेजबाबदारपणे वाहतूक कशी काय केली जाते, हा प्रश्न उपस्थित होणं चुकीचं नाही. या घटनेमुळे कुरिअर व्यवसाय चर्चेत आला; पण या व्यवसायाची अवस्था वाटते तेवढी अलबेल राहिलेली नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येक काम सोपे झाले आहे. आॅनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या व्यवसायाला सुवर्ण झळाली आली आहे, असे वरवर वाटत आहे. मात्र, या वस्तूंचे बुकिंग दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, गुजरात येथून होत असते. त्यामुळे याचा फायदाही तेथीलच कुरिअर कंपन्यांना होत आहे. कुरिअर व्यावसायिकांची प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र संस्थान आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा कारभार स्वतंत्र चालत असला तरी ते एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे बुकिंग किती झाले त्यावर मानधन मिळते; घरपोच सेवेचे तुटपुंजे मानधन मिळत असल्याने महानगरे वगळता उर्वरित शहरांमध्ये जवळजवळ फुकटातच हमाली करावी लागत आहे. मूळ कागदपत्रे पोहोच करण्यासाठी वापर मोबाइलवर ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप आल्यामुळे अनेक कंपन्यांची नव्वद टक्के कामे ई-मेलद्वारे होते. त्यामुळे नोकरीचे नियुक्तीपत्रांपासून अनेक कामे मेलद्वारे कळविले जाते. त्यामुळे कुरिअरवाल्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आता मूळ कागदपत्रे पोहोच करायची असतील तरच कुरिअरचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यातून दररोज पार्सल व पाकिटे मिळून सरासरी सहाशे बुकिंग होत आहे. रोजची बुकिंग चांगली होत असेल तरच हा व्यवसाय चालू शकतो. - सोनल बोधे, कुरिअर व्यावसायिक, सातारा