शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ, सातारा जिल्ह्यात किती वाहनांनी बसविली नंबरप्लेट.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:18 IST

सर्व वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बंधनकारक

सातारा : २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अद्याप जुन्या वाहनांना नंबरप्लेट बसवण्याचं काम संथगतीने सुरू असल्याने ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२५ पर्यंत हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ दिली आहे. आत्तापर्यंत ६२ हजार वाहनांनी ही नंबरप्लेट आपल्या वाहनांना बसवून घेतली आहे.सर्व वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक केले आहे. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हायसिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. परंतु २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही ही नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

अशी असते नंबरप्लेट..ॲल्युमिनियमपासून बनलेली नंबरप्लेटची जाडी १ मिलिमीटरपेक्षा थोडी अधिक असते. त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक तसेच होलोग्राम खाली लेझर बॅण्डेड १० अंकी पिन कोड असतो.

२०१९ची लाखो वाहने रस्त्यावर..जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर त्या वाहनावर कारवाई केली जाणार आहे; परंतु २०१९ पूर्वीची लाखो वाहने रस्त्यावर धावत असून, यासाठी पुरेशी मुदत देऊन तोपर्यंत दंडात्मक कारवाई स्थगित करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

किंमत किती आहे..दुचाकीसाठी एचएसआरपी नंबरप्लेटची किंमत ४०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी १ हजार १०० रुपये आहे. याशिवाय जर कोणी जास्त पैसे आकारत असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.वाहनासाठी अतिरिक्त संरक्षणहायसिक्युरिटी नंबरप्लेट किंवा एचएसआरपी नंबरप्लेट ही सुरक्षिततेचे जाळे म्हणून काम करते आणि तुमच्या वाहनासाठी अतिरिक्त संरक्षण सुनिश्चित करते. याला हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असेही म्हणतात आणि बनावटगिरी, छेडछाड आणि वाहनाशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीस