शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:32 IST

डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील शेतकरी होणार आर्थिक सक्षम

नितीन काळेल।सातारा : डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात. त्यासाठी शेतकºयांनी स्वत: निर्यातदार व्हावे, यासाठी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने त्यासाठी पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनातून शेतकºयांना निर्यातदार होता येणार असून, व्यापाºयाला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जात आहे. अनेक शेतकºयांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहे; पण हे डाळिंब व्यापाºयांच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती चांगला दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी एक पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील १०० शेतकºयांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यामातून शेतकºयांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांचे प्रमाण, कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असेल तर त्याच्या अटी, नियम काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करायचे झाल्यास त्याचे वजन हे २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहित असणेही गरजेचे आहे. असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब बसतात. त्याची वाहतूक तीन ते पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकºयांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.व्यापाºयांचा हस्तक्षेप नसणार...जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब बाजारात आपला माल घेऊन जातात. तेथे व्यापारी खरेदी करतात. त्यावेळी व्यापारी म्हणेल तो दर असतो. तर काही व्यापारी शेतकºयांच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. चांगला माल व्यापारी बाहेरील देशात निर्यात करतात. माल शेतकºयांचा; पण फायदा व्यापाºयांचा होतो. त्यातून व्यापाºयांनाच अधिक पैसे मिळतात. शेतकºयांनी स्वत:च माल निर्यात केला तर दुप्पट, तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. त्यातून शेतकºयांचे आर्थिक जीवनमान अधिक उंचावणार आहे. तर सातारा जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी डाळिंब घेतात. त्यांना यामुळे अधिक पैसे मिळणार आहेत. एकंदरीतच शेतकºयांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी