शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या दुप्पट रस्ता खुदाईसाठी खर्च; महाबळेश्वरमधील विद्युत कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:23 IST

महाबळेश्वरमध्ये सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून नवीन उपकेंद्रांसह विविध विद्युत विकास कामे सुरू आहेत;

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून नवीन उपकेंद्रांसह विविध विद्युत विकास कामे सुरू आहेत; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने खुदाई शुल्कापोटी प्रती रनिंग मीटर साडेपाच हजार रुपये शुल्क आकारल्याने विद्युत विकासाची कामे ठप्प आहेत.

याबाबत माहिती अशी की, भूमिगत केबल टाकण्यासाठी महावितरणला ८६ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च येतो, ती केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल दीड लाख रुपयांचे खुदाई शुल्क मागितले आहे. खुदाई शुल्काचा तिढा कायम राहिल्यास महाबळेश्वरच्या विद्युत विकास कामांसाठी आलेला निधी दुसऱ्या कामांकडे वळविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

महाबळेश्वरमध्ये सद्य:स्थितीत ३,२०० वीजग्राहक आहेत. तेथे दरवर्षी विजेची मागणी बºयापैकी वाढत आहे. सद्य:स्थितीत महाबळेश्वरला ग्रामीण व शहरी असा एकत्रित भार असलेल्या उपरी वीज वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. दºयाखोºयामधून जाणाºया या उपरी वीजवाहिनीची लांबी अधिक असल्याने मुसळधार पाऊस, वादळ व इतर नैसर्गिक कारणांमुळे बºयाचदा वीज पुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यामुळे सुरळीत वीजसेवा देण्यासाठी नवीन वीज यंत्रणा उभारणे व त्या यंत्रणेचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.

महाबळेश्वरचा वीजपुरवठा सक्षम, सुरळीत करण्यासाठी महावितरणने केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महाबळेश्वरसाठी ३ कोटी ४ लाख रुपये खर्चाचे ३३/२२ केव्ही क्षमतेचे जीआयएस उपकेंद्र प्रस्तावित आहे. हे अत्यंत आधुनिक स्वरुपाचे उपकेंद्र आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.

या उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी ३३ केव्ही क्षमतेची ३ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनी टाकावी लागणार आहे. या भूमिगत वाहिनीसाठी ८६ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; परंतु या भूमिगत वीजवाहिनीसाठी तीन किलोमीटरच्या रस्ता खुदाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल साडेपाच हजार रुपये प्रती मीटर शुल्क आकारले आहे. प्रस्तावित भूमिगत वीजवाहिनीच्या खर्चापेक्षा खोदाई शुल्क दुपटीने आकारण्यात आलेले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खुदाई शुल्क कमी करण्याबाबत महावितरणने वारंवार पाठपुरावा केला आहे; परंतु अद्यापही खुदाई शुल्काचा तिढा कायम आहे. याउलट पाचगणी गिरिस्थाननगर परिषदेने महावितरणला केवळ १,१५० रुपये प्रतीमीटर खुदाई शुल्क आकारलेले आहे. तेथील विद्युत विकासाच्या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी हे शुल्क सुद्धा महावितरणकडून भरण्यात आलेले आहे.दरम्यान, शासनाच्या दोन विभागांमधील कारभारामुळे महाबळेश्वरमधील नागरिकांचे तसेच येथे येणाºया लाखो पर्यटकांचे हाल होणार आहेत, यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.खुदाई शुल्काचा समावेशच नाहीमहाबळेश्वरमध्ये प्रस्तावित नवीन जीआयएस उपकेंद्र झाल्यास ग्रामीण व शहरी भागाचा वीजपुरवठा वेगवेगळ्या वीजवाहिन्यांद्वारे होणार आहे. त्यामुळे सध्या एकाच वीजवाहिनीवरून होणाºया वीजपुरवठ्यातील व्यत्यय संपुष्टात येणार आहेत; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणामुळे ही कामे पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.महाबळेश्वरसाठी प्रस्तावित विद्युत विकासाच्या कामांच्या निधीमध्ये खोदाई शुल्काचा कुठल्याही प्रकारे समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणकडे निधी उपलब्धता नसल्यामुळे खोदाई खर्च करणे महावितरणला शक्य नाही व आता ही कामे पूर्णपणे थांबलेली आहेत. त्यामुळे महाबळेश्वर शहर व परिसरात नवीन वीजयंत्रणा उभारण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा