शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पांडवगडावर ट्रेकर्सची रोमांचक कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:25 IST

बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला व ही मोहीम यशस्वी केली.वाई नगरीला अनेक ...

बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला व ही मोहीम यशस्वी केली.वाई नगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड, सोनजाई अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाईच्या जवळ असणारी दुर्गशिखरे माना वर काढून डोकावत असतात. त्यातच विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड.या गडाच्या दोन बाजूने असणारा व काळजात धडकी भरवणारा भव्यदिव्य कातळकडा, मधमाशांचे पोळे व सरपटणाºया जीवांचे भय ते वेगळेच. त्यामुळे इकडे फक्त साहसी ट्रेकर्सच येतात.परंतु पांडवगडचा प्रवास कठीण असला तरी मात्र या प्रवासात निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळते. याच पांडवगडावरती योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकचे तज्ज्ञ प्रशिक्षक रणवीर गायकवाड, तुषार घोरपडे, अक्षय पवार यांच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. गिर्यारोहण क्रीडा प्रकारातील साहसी समजल्या जाणाºया रॅपलिंगची मोहीम घेण्यात आली.यामध्ये योद्धा प्रतिष्ठानचे सदस्य सूरज घोरपडे, प्रसाद भोसले, आनंद पवार, संकेत मराठे, सत्यजित आमराळे, अथर्व यादव, दिलीप रवळेकर, गणेश मराठे, जयदीप कांबळे, रोहित भोसले, सोहम घोरपडे, सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन ही मोहीम पूर्ण केली.सातारा, वाई व गंगापुरी या भागातून १२ ते ५२ वर्षांच्या ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणाºया १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला. काहीजणांसाठी रॅपलिंगचा अनुभव नवीनच होता. तरीही योद्धा प्रतिष्ठानच्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इच्छाशक्तीच्या जोरावर तो सर्वांनी यशस्वी करून दाखविला. त्यांचे कौतुक होत आहे.पाच हजार फूट उंचीच्या गडावर मोहीमगेल्या दोन वर्षांत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून १२५ मोहिमा यशस्वी करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील ६५ गडकिल्ले पालथे घातले आहेत. योद्धा प्रतिष्ठानने नाशिकच्या आलंग, मदन, कुलन या महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाºया पाच हजार फूट उंचीच्या गडावर नुकतीच रॅपलिंगची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यापुढे ही अशीच उंच-उंच गडांवर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मोहिमा राबविण्यात येणार आहेत, असे रणवीर गायकवाड यांनी सांगितले.