शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीपद स्वतःला, आपल्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते - मंत्री शंभूराज देसाई 

By प्रमोद सुकरे | Updated: December 24, 2024 19:34 IST

ते खासदार उदयनराजेंचे व्यक्तीगत मत

कराड : पालकमंत्री पद  स्वतःला मिळावे, स्वतःच्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र हा अधिकार आम्हाला कोणालाच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा तो अधिकार आहे. जोपर्यंत या तिघांचे पालकमंत्री कोणाला करायचे यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण जर खासदार उदयनराजे याबाबत काही बोलले असतील तर ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते असे मत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सातारा जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात ४ कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. पण अजून जिल्ह्याचा पालकमंत्री ठरलेला नाही. यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी तर पालकमंत्री पद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावे असे जाहीर मागणी केलेली आहे. त्यामुळे उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.याबाबत माध्यमांनी छेडले असता मंत्री देसाई बोलत होते.मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर पर्यटनासारखी महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला मोठी संधी असून ऐतिहासिक परंपरा असलेल्या गड किल्ले यांचे संवर्धन करुन गडकोट पर्यटन वाढवण्यावर भर देणार आहे. आत्ताच्या पर्यटन स्थळांमध्ये आधुनिक सुधारणा करुन विकास केला जाणार आहे.महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत शासनाची भुमिका काय आहे? याबाबत छेडले असता मंत्री देसाई म्हणाले, पूर्वीच्या मंत्र्यांनी  काय केलेले आहे? स्थानिकांचा किती सहभाग आहे? त्या सर्वांचा आढावा घेऊन याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरguardian ministerपालक मंत्रीShambhuraj Desaiशंभूराज देसाईUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले