फलटण : स्वतःच्या लेटर हेडवर पटकथा लिहून आगवणे यांच्या मागे ईडी कोणी लावली, हे सर्वांना माहीत आहे. सुरवडीच्या प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी माझे नाव घेतले. त्यांना मी सोडणार नाही. मी आधीच सांगितले होते. माझ्या नादी लागू नका. दुसऱ्याला माझे नाव घ्यायला लावण्यापेक्षा स्वतः माझे नाव घ्या, मी वाटच बघतोय. मी कोणाला घाबरत नाही. तुमच्यामागचा मास्टर माइंड कोण आहे. त्यालाही मी घाबरत नाही. या वयात मला तुरुंगात टाकलं तरी चालेल, मी तुरुंगात बसून त्यांना थर्ड लावेन, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.फलटण येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, प्रगती कापसे आदी उपस्थित होते. यावेळी रामराजे म्हणाले, “पीडिता डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मी षडयंत्र केल्याचा आरोप होत आहे. आत्महत्या झाली, त्या दिवशी मी पुण्यात होतो. त्यांच्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांचा माझ्याशी सबंध नाही. एक फोन कॉल मी ऐकला. त्यात त्यांना सांगण्यात येत होते. तुम्ही रामराजे यांचे नाव घ्या, आपण सगळे विषय मिटवू.इतिहासाला काळिमा लावणारी घटनाफलटणमधील नाईक निंबाळकर घराण्याला १,२०० वर्षांचा इतिहास आहे. श्रीमंत मालोजीराजे यांचे संस्कार आमच्यावर आहेत. या संस्कारातूनच आमच्याकडून आत्तापर्यंत सेवा झाली. इतिहासाला काळिमा लावणारी घटना येथे घडली. मी पाच वर्षापासून सांगतोय काळा इतिहास असणारी ही माणसं तुमच्या उंबऱ्यात आली आहेत. त्यांना वेळीच रोखायची जबाबदारी तुमची आहे, अशी टीका रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
Web Summary : Ramraje Naik Nimbalkar warned opponents at a public meeting, denying involvement in a suicide case and accusing rivals of plotting against him. He vowed retaliation, even if jailed.
Web Summary : रामराजे नाइक निंबालकर ने एक सार्वजनिक सभा में विरोधियों को चेतावनी दी, आत्महत्या के मामले में अपनी संलिप्तता से इनकार किया और प्रतिद्वंद्वियों पर साजिश रचने का आरोप लगाया। उन्होंने जेल जाने पर भी बदला लेने की कसम खाई।