मसूर : शहापूर (ता. कऱ्हाड) येथे शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने येथील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते झाला.
यावेळी कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे, उंब्रज पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, शहापूरचे सरपंच ताजुद्दीन मुल्ला, शहापूरचे ग्रामविकास अधिकारी, तलाठी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व शहापूरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
०३ मसूर-शहापूर
शहापूर येथे विलगीकरण कक्षाचे लोकार्पण मानसिंगराव जगदाळे, सुहास बोराटे, अजय गोरड, प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.