शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पर्यावरण दिन विशेष: जाई प्लास्टिक पोटात; पचन बिघडून पशुधन धोक्यात

By जगदीश कोष्टी | Updated: June 5, 2025 12:50 IST

प्लास्टिकचा अतिवापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत

जगदीश कोष्टीसातारा : बदलत्या काळानुसार माणसाची जीवनशैली सुधारली; पण आचारण बिघडत गेेले. घरातील शिळ्या भाकरी, चपाती, भाज्यांची देठे पूर्वी थेट जनावरांसमोर टाकले जात; पण आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्लास्टिकमधून आणून रस्त्याच्या कडेला टाकले जातात. हे अन्न खाताना अनेकदा जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाते. मात्र, त्याचे पचन व्यवस्थित न झाल्याने पुढे पचनसंस्था बिघडते. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास जनावरे दगावण्याचाही धोका संभवतो.सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट झाडीमुळे विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यातच कास पुष्प पठार, महाबळेश्वरचा निसर्ग जगभरातील पर्यटकांना साद घालत असतो. त्याचबरोबर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या खूपच संवेदनशील आहे; पण गेल्या काही वर्षांपासून या पर्यावरणाला गालबोट लावले जात आहे.प्लास्टिकचा अतिवापर हा याला कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. कित्येक वर्षे ते तसेच राहते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचबरोबर सजीवनांही धोका संभवत आहे. तो टाळण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे आवश्यक आहे.

रवंथ करता येत नाहीजनावरे दिवसभर भराभर चारा खात असतात. हा चारा त्यांच्या मोठ्या जठरात साठते. त्यानंतर रात्रभर ते हाच तोंडात आणून रवंथ करत राहतात. प्लास्टिक वजनाला हलके असल्याने ते जठराच्या खाली बसते. त्यामुळे रवंथ करण्यासाठी तोंडात परत येत नाही.

काही दिवसांत बनतात कडकहे प्लास्टिक वारंवार खाण्यात आले तर काही दिवसांनी मोठ्या जठरात ते दगडासारखे कडक होते. नंतर ते पुढील आतड्याच्या तोंडाला अडकते. त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे जनावर चारा खात नाही. पुढे पचनसंस्था बिघडल्यामुळे जनावर दगावण्याचा धोका असतो.

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाला फार मोठे स्थान असते. मात्र, माणसांच्या दुर्लक्षामुळे जनावरांच्या खाण्यात प्लास्टिक जात असल्याने ते दगावतात. ही बाब आपणाला परवडणारी नाही. - डॉ. महेश लकडे, पशुधन विकास अधिकारी 

कोकणात फिरायला गेलो असता समुद्रकिनारी एक पक्षी वरखाली जात होता. यावेळी लक्षात आले की, त्या पक्ष्याच्या गळ्यात प्लास्टिक बाटलीचे झाकण अडकले होते. ही घटना पाहून मनात घालमेल सुरू झाली अन् साताऱ्यात आल्यावर सागरमित्र अभियान ही संस्था स्थापन केली. यामध्ये साताऱ्यातील घर, सोसायटीत जाऊन आम्ही प्लास्टिक संकलन करत असतो. - सोहम कुलकर्णी, सातारा. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरणAnimalप्राणी