शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 13:23 IST

कऱ्हाड : येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेरीस सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर आहे. सत्ताधारी ...

ठळक मुद्देकृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवरविरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत

कऱ्हाड : येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेरीस सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होत असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल.पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत गुरुवारी प्रारंभ झाला. मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्‍यात होत आहे.सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल ९१ टक्के मतदान होऊन ३४ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी सकाळी ८ वाजता ७४ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

यासाठी सुमारे ३०० कर्मचारी काम करत आहे. प्रत्येक टेबलवर दोन मतदान केंद्राची मोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ५,५४६ एवढ्या मोठ्या मताधिक्याने सहकार पॅनेलचे विलास भंडारे यांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी विजयाकडे वाटचाल करीत आहे.अनुसूचित जाती जमाती

  • विलास भंडारे : (सत्ताधारी सहकार पॅनल) १०,१६९  
  • शिवाजी आवळे : (संस्थापक पॅनल) ४,६२३ 
  • अधिक भंडारे :  (रयत पॅनल) २,१७६ 
  • सहकार पॅनलचे विलास भंडारे ५,५४६ मतांनी आघाडीवर 

इतर मागास प्रवर्ग पहिली फेरी

  • वसंतराव शिंदे (सहकार पॅनल) १०१२५ 
  • मिलिंद पाटणकर (संस्थापक पॅनल) ४६३३
  • शंकरराव रणदिवे (रयत पॅनल) २१९८
  • सहकार पॅनलचे वसंतराव शिंदे ५,४९२ मतांनी आघाडीवर

विमुक्त जाती व भटक्या जमाती

  • अविनाश खरात (सहकार पॅनल १०१८०)
  • नितीन खरात (संस्थापक पॅनल ४,५६८)
  • आनंदराव मलगुंडे (रयत २१३०)
  • शंकर कारंडे (३७)
  • सहकार पॅनेलचे अविनाश खरात ५,६१२ मतांनी आघाडीवर
टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेKaradकराडElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर