सातारा : ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, याचा सातारा नगरपालिका हद्दीतील दारिद्र्यरेषेचा दाखला असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी केले.यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट व उपनगराध्यक्ष जयवंत भोसले उपस्थित होते. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा दारिद्र्यरेषेचा दाखला असलेल्या कुटुंबाना उपजीविकेचे साधने उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश असून, यासाठी नगरपरिषदेमध्ये शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. या अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाची कर्जाची उपलब्धी करून दिली जात आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील बचतगटांना फिरता निधी व व्यवसायासाठी कर्ज उपलब्धी करून देण्यात येत आहे.१२ विविध प्रकारच्या कोर्सेसद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार उपलब्ध होऊ शकेल.याकरिता लाभार्थ्यांचे वय १८ वर्षे असावे व किमान पाचवी शिक्षण झालेले असावे, प्रशिक्षण हे महाराष्ट्र कौशल्य विकास संस्था व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांची मान्यता असलेल्या दर्जेदार प्रशिक्षण संस्थामार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी तीन महिन्यांचा असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विविध योजनांचा लाभ घ्यावा व यासाठी सातारा नगरपरिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
पाचवी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार
By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST