महावितरणच्या अधिकार्‍याना कर्मचार्‍यानीच कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:35 PM2017-11-21T23:35:31+5:302017-11-21T23:36:23+5:30

The employees of Mahavitaran's office are the only ones who can not be trusted | महावितरणच्या अधिकार्‍याना कर्मचार्‍यानीच कोंडले

महावितरणच्या अधिकार्‍याना कर्मचार्‍यानीच कोंडले

Next


कºहाड : खांबावर विद्युत धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या घटनेला जबाबदार धरून दोन कर्मचाºयांना निलंबित केल्याप्रकरणी कºहाडमध्ये तणाव निर्माण झाला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कर्मचाºयांनी महावितरणच्या अधिकाºयांना कार्यालयात डांबून ठेवले. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतरही तोडगा काढण्यात यश मिळाले नाही.
धोंडिराम गायकवाड या वायरमनचा सोमवारी निगडी येथे खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला होता. काम सुरू असतानाही वीजपुरवठा सुरू केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले. हे समजताच संतप्त झालेल्या सुमारे १०० वायरमन मंडळींनी मंगळवारी ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, दिवसभर अधिकाºयांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अधिकारी घरी जात असताना चिडलेल्या कर्मचाºयांनी त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. या अधिकाºयांसह कारकून मंडळींना कार्यालयातच कोंडले. कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून वायरमन मंडळी बराचवेळ आपल्या मागणीवर ठाम राहिली.
रात्री उशिरापर्यंत हे अधिकारी आतच अडकल्याचे समजताच पोलिसांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ओगलेवाडी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
विजेचा अधिकार अधिकाºयांनाच...
विद्युत खांबावर दुरुस्ती सुरू असताना विद्युतपुरवठा बंद ठेवणे अथवा सुरू करणे याचा निर्णय केवळ महावितरणचे अधिकारीच घेऊ शकतात. त्यांनी आदेश दिल्यानंतरच कर्मचारी विद्युतपुरवठा सुरू करतात. त्यामुळे निगडी दुर्घटनेला अधिकारी जबाबदार असताना कर्मचाºयांना निलंबित करण्याचा निर्णय चुकीचा आहे. तेव्हा संबंधितांवरची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या वायरमन मंडळींची आहे.

Web Title: The employees of Mahavitaran's office are the only ones who can not be trusted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.