शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांवरील गाढ विश्वासावर बनलं ‘बादशाही’ कुटुंब!

By admin | Updated: April 21, 2016 22:22 IST

कातरखटाव : २८ जणांचे कुटुंब नांदतंय गुण्यागोविंदानं; पाच भावांची फॅमिली आजही एकत्रच...

एकमेकांवरील गाढ विश्वासावर बनलं ‘बादशाही’ कुटुंब!कातरखटाव : २८ जणांचे कुटुंब नांदतंय गुण्यागोविंदानं; पाच भावांची फॅमिली आजही एकत्रच...शेखर जाधव ल्ल वडूजनव्या पिढीच्या इच्छा आकांक्षांना वाव, निर्णय स्वातंत्र्य, पारदर्शी व्यवहार, एकमेकांबद्दल आदर आणि भावाभावांमध्ये विश्वासाचे अतूट नाते या पाच मूलमंत्रांवर कौटुंबिक एकतेचा संदेश देत कातरखटाव येथील अठ्ठावीस जणांचे मुल्ला कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रित गुण्या-गोविंदाने नांदत आहे.लहान-थोर सर्वजण कुटुंबासाठी अहोरात्र झटत आहेत. कुटुंब प्रमुख बादशाहभाई आणि त्यांच्या पत्नी कुलसू यांचे कष्ट, संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन दारिद्र्यातून समृद्धीकडे एकीची यशस्वी वाटचाल मुल्ला कुटुंबीयांची सुरू असून, सध्याची पिढी आदर्शवत ठरत आहे.कायम दुष्काळी भाग म्हणून राज्याला परिचित असणाऱ्या खटाव तालुक्यातील कातरखटाव हे गाव विविध कारणांने जिल्ह्याला परिचित आहे. सांगली-भिगवण राज्य मार्गावरील हे गाव वडूजच्या पूर्वेला आहे. सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात मुल्ला कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्य करीत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शेतीमधून चिकाटीने एकमेकांची विश्वासार्हता जपत आलम, सलीम, हनिफ, मुबारक आणि आसिफया पाच भावंडांनी कुटुंबांच्या प्रगतीचा आलेख वाढविला आहे.बादशाहभाई आणि कुलसू यांच्या पोटी पाच मुले आणि दोन मुली अशी सात अपत्ये, घरातील परिस्थिती अगदीच हलाखीची होती. शेतात पिकेल त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा; परंतु शेतीवर उपजीविका होत नसल्याचे पाहून बादशाहभार्इंनी मुंबई गाठली. खासगी नोकरी करीत घरोघरी भांडी विकून कुटुंबाला आधार दिला. त्यांच्या कष्टाला त्यांची पत्नी कुलसू भाभींनी मोलाची साथ दिली. अशिक्षित असूनही मुलांना संस्काराची शिदोरी आणि शिक्षण दिले. संघर्षाशिवाय या जीवनात यश संपादन होत नाही, हे ज्ञात असलेल्या मुल्ला कुटुंबीयांची याच नीतिमूल्यांवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. १९७८ मध्ये बादशाहभाई मुंबईहून पुन्हा कातरखटावला परतले. थोरला मुलगा आलम याने दहावीनंतर प्रपंचाचे रहाटगाडे सांभाळण्यासाठी आखाती देश गाठला. सौदीला फॅब्रिकेशनमध्ये काम करून गावी भावंडांना आधार दिला. दुसरा मुलगा सलीम मुंबई पोलिस झाला. तिसरा हनिफएसटी चालक बनले. चौथा मुलगा मुबारक याने पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले, तर पाचवा मुलगा आसिफ हा पदवीधर असून देखील व्यवसायात उतरला. मुलगी रहामत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरी मुलगी रजिया या गृहिणी आहेत. या कुटुंबीयांची खरी ओळख बादशाही ढाब्यामुळे सर्वदूर पोहोचली असून, या व्यवसायात ग्राहक हाच आपला देवता असल्याचे मानून तशी वागणूक ही दिली जात आहे. त्यामुळेच खूप दूरवरून प्रवास करणारे अनेकजण याच ढाब्यावर जेवायला येतात. कातरखटाव परिसरातच बादशाह फर्निचरचे दुकान टाकले आहे. विचारांची मोकळीक महत्त्वाचीमुल्ला कुटुंबाला गावातच नव्हे, तर तालुक्यात मानाचे स्थान आहे. समाजकारण, राजकारण आणि कुटुंबाबरोबरीने गावचा एकोपा टिकविण्यासाठी सर्वांचीच असणारी धडपड वाखणण्याजोगी आहे. मानव धर्माचे तंतोतंत पालन करीत आपुलकी, जिव्हाळा सांभाळणारे मुल्ला कुटुंबाची ही आजची आधुनिक पिढी एकत्रित उभी आहे. प्रत्येकाच्या विचाराला मोकळीक, एकत्रित जेवण आणि त्याचबरोबरीने कामाचे नियोजन या गोष्टीमुळे हे कुटुंब सर्वांना आदर्श ठरत आहे. स्पष्टवक्तेपणा अंगी असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते, हे माहीत असल्यामुळेच या कुटुंबाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. १९९३ मध्ये बादशाहभार्इंचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कुलसू भाभींनी मुलांना आधार दिला. भावी पिढी शिक्षणात अग्रेसर राहावी, यासाठी घरातून प्रोत्साहन दिल्यानेच तिसऱ्या पिढीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.