शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पूर आला, दरड कोसळली; सातारा जिल्ह्यात आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू 

By नितीन काळेल | Updated: June 17, 2024 18:34 IST

बोटींग चाचणी : संकटे दूर करण्यासाठी प्रशासनाची विविध पातळीवर उपाययोजना 

सातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक जूनपासूनच २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू आहे. यामुळे दरड कोसळली, पूर आला तर लगेच अशी संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर पावसाळ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी घेण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ तास सतर्क असून विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना केल्या आहेत.जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे दोन ते अडीच महिने जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस कोसळतो. महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही.तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असतो, झाडे पडतात. अशा काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. याकरिता जिल्हा प्रशासन एक महिना अगोदरच आढावा घेऊन तयारी करते. आताही पावसाळ्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात दरवर्षी एक जूनपासून आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येतो. हा कक्ष २४ तास सुरू असतो. आताही हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच विविध विभागांचेही कक्ष सुरू राहणार आहेत. तर कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो. या काळात उपाययोजना राबविण्यात येतात.या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागाच्या वतीने कऱ्हाड येथील प्रीतिसंगम परिसरात बोटिंग चाचणी घेण्यात आली. यावेळी बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, स्ट्रेचर आदींचा वापर करण्यात आला. यावेळी कऱ्हाड पालिकेचे पथक तसेच १५० होमगार्ड्स, नदी काठावरील गावांतील तरुण, तलाठी, मंडलाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूरlandslidesभूस्खलन