शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य; कर्मचाऱ्याने भत्ता नाकारला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:01 IST

सध्याच्या काळात चार पैसे ज्यादा कसे मिळतील, हा विचार करणारे लोक पावलोपावली भेटतात. पगारात भागवा, असे शासन सांगत असले तरी शासनाने दिलेला चांगला पगारही काहींना पुरत नाही. लाखांचा पगार घेऊन शासनाच्या तिजोरीवर पोसलेली मंडळीही अतिरिक्त कामाचा एक पैसाही सोडत नाही.

ठळक मुद्दे विधानसभेचे काम : रवी कदम यांचा प्रेरणादायी निर्णय

सागर गुजर

सातारा : नेहमीच्या कामासोबत अतिरिक्त काम लागले की कर्मचाऱ्यांना भत्ते दिले जातात. नियमाप्रमाणे हे भत्ते मिळणं हा कर्मचाºयांचा अधिकार असतो. मात्र, हा भत्ताच नाकारून आगळं-वेगळं राष्ट्रीय कर्तव्य बजावणाºया प्रधानमंत्री सडक योजनेतील वरिष्ठ लिपिक रवींद्र कदम हे चर्चेचे व्यक्ती ठरले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र कदम यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कंट्रोल रुममध्ये नेमणूक केली होती. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ नुसार कंट्रोल रुममध्ये १२ तासांसाठी एक महिनाभर कदम यांनी इतर अधिकारी व कर्मचा-यांसोबत या ठिकाणी सेवा बजावली.

शासन निर्णय क्रमांक १ अन्वये निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अराजपत्रित कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जातो. मात्र, हा भत्ताच मला नको, असे रवींद्र कदम यांनी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिका-यांना पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, क-हाडातील रहिवासी असलेले रवींद्र कदम हे रोज साठ किलो मीटरचा प्रवास करून निवडणुकीच्या कामासाठी साताºयात येत होते. आपण जे काम करतोय ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करायला हवे. तसेच ते करत असताना मनात कुठल्याही प्रकारचा हव्यास ठेवायचा नाही, असं ठरवणारे रवींद्र कदम हे दुर्मीळ उदाहरण ठरले आहेत.

सध्याच्या काळात चार पैसे ज्यादा कसे मिळतील, हा विचार करणारे लोक पावलोपावली भेटतात. पगारात भागवा, असे शासन सांगत असले तरी शासनाने दिलेला चांगला पगारही काहींना पुरत नाही. लाखांचा पगार घेऊन शासनाच्या तिजोरीवर पोसलेली मंडळीही अतिरिक्त कामाचा एक पैसाही सोडत नाही. अशा वातावरणात हक्काचे पैसे नाकारून शासनाला हातभार देण्याचे काम कदम यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

शासनाची २५ हजारांची बचतप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत काम करणारे रवींद्र कदम यांची निवडणूक विभागाने कंट्रोल रुममध्ये नेमणूक केली होती. त्यांनी केलेल्या कामाचे २५ हजार रुपये इतका भत्ता शासनाकडून मिळाला असता; परंतु कदम यांनी तो नाकारून शासनाचे पैसे वाचविले आहेत. 

माझ्या कामासोबत एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मी विधानसभा निवडणुकीचे काम केले आहे. शासन मला माझ्या कामाचा पगार देते. या व्यतिरिक्त भत्ता घेणे हे माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे मी निवडणूक भत्ता नाकारला आहे.- रवींद्र कदम, वरिष्ठ लिपिक, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMONEYपैसा