शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आठ तासांनंतर थांबली घारीची जीवघेणी फडफड, नारळाच्या झाडावर मांज्यात अडकले होते पंख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:07 IST

पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात अडकून आजपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, साता-यात नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका घारीला जीवदान मिळाले.

सातारा : पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात अडकून आजपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, साता-यातनागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका घारीला जीवदान मिळाले. गुरुवार पेठेतील एका नारळाच्या झाडावर मांज्यात अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका करण्यात आली अन् आठ तासांपासून सुरू असलेली घारीची जीवघेणी फडफडही थांबली.याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार बागेजवळ एका घराशेजारी नारळाचे झाड आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या झाडावर एक घार पतंगांच्या नायलॉन धाग्यात अडकली. पंख धाग्यात गुंतल्याने प्रयत्न करूनही तिला उडता येत नव्हते. घारीची सुरू असलेली फडफड येणा-या-जाणा-या नागरिकांच्या नजरेस पडली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती या ठिकाणी राहणा-या अरबाज शेख यांना दिली. यानंतर सर्वांचे घारीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अरबाज शेख यांनी प्रारंभी नारळाच्या झाडावर चढणा-या काही व्यक्तींशी संपर्क साधला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. तोपर्यंत घार झाडावरच अडकून होती. वनविभागाच्या कर्मचा-यांनी युवकांशी संपर्क साधला. यानंतर काही युवक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता त्या युवकांनी झाडावर चढून मांज्यात अडकलेल्या घारीची सुटका केली आणि आठ तासांपासून सुरू असलेली घारीची जीवघेणी फडफडही थांबली. वनअधिकारी व कर्मचा-यांसह अरबाज शेख, नीलेश राजपूत, संजय ताटे, चैतन्य ताटे, जुनेद बागवान, मुन्ना बागवान यांनी घारीची पाहणी केली. घारीलाकुठेही जखमा झाल्या नव्हत्या. खाद्य व पाणी न मिळाल्याने ती अशक्त झाली होती. नागरिकांनी तातडीने या घारीला पाणी पाजले. यानंतर घार पक्षीमित्रांच्या ताब्यात देण्यात आली. नंतर या घारीला तिच्या अधिवासात सोडण्यात आले.