शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

अन्नातील खते अन् जंतुनाशकाचा स्त्री बीजावर परिणाम

By प्रगती पाटील | Updated: November 9, 2024 19:24 IST

सातारा : सकस आहाराच्या नावाखाली दैनंदिन आयुष्यात ताटात येणाऱ्या अन्नात असलेली खते आणि जंतुनाशके स्त्री बीज निर्मितीवर परिणाम करत ...

सातारा : सकस आहाराच्या नावाखाली दैनंदिन आयुष्यात ताटात येणाऱ्या अन्नात असलेली खते आणि जंतुनाशके स्त्री बीज निर्मितीवर परिणाम करत आहेत. कमी गुणवत्ता असलेल्या स्त्री बीजामुळे गर्भ खराब होवुन गर्भपात होण्याची शक्यता बळावते आहे. गर्भ खराब होण्याचे प्रकार टाळायचे असतील तर पालकत्वाचा विचार करणाऱ्या जोडप्याने आहारात बदल करणे आणि खात्रीशीर उपचार घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातून बाहेर महानगरांमध्ये स्थिरावलेल्या जोडप्यांना गर्भ राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनुवांशिकता नसतानाही असे प्रकार होण्यामागे महानगरांमध्ये खते आणि जंतुनाशकाचा मारा असलेले अन्न कारणीभूत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘लो एएमएच’ असे संबोधले जाते. पूर्वी ४५ ते ५० वयात पाळी जायची, आता स्त्री बीज लवकर संपल्यास हे दोष दिसू शकतात.

तर टेस्ट ट्युब बेबीचा पर्यायगर्भधारणा होत नसल्यास अद्यावत उपचार घेवून लवकर गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये गुणवत्ता चांगली होण्यासाठी काही आैषधांचा वापर केला जातो. स्त्री बीज संख्या एकदा संपली की ती पुन्हा वाढत नाही. किती प्रमाणात संख्या कमी आहे त्यावरून उपचार ठरवले जातात. जास्त प्रमाणात स्त्री बीज कमी असल्यास टेस्ट ट्युब बेबीचा वापर करून गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केला जातो.

ट्रायसोमीचे हे आहेत प्रकारकमी गुणवत्ता असलेल्या स्त्री बीजामुळे सारखा गर्भ खराब होवू शकतो. जास्त खराब गुणवत्ता असल्यास तो गर्भ मध्ये ट्रायसोमी विकार असू शकतात. यामध्ये मुल जन्माला आल्यास ते मतिमंद होवू शकते. यासाठी गर्भधारणा झाल्यानंतर डबल, ट्रीपल क्वाड्रप्ल मार्कर, एनटी स्कॅन आदी तपासणी करून गर्भ निरोगी आहे का ते तपासून घेणे महत्वाचे ठरते.

कमी वयात गर्भ खराब होण्याच्या तक्रारी अलिकडे वाढलेल्या दिसतात. आनुवंशिकता, आहारातील बदल, जंक फूड, खते आणि जंतुनाशकाचा वापर केलेले अन्न, वातावरण बदल अशी काही कारणे आहेत. गर्भधारणेसाठी अडसर ठरत असलेल्या या गोष्टींबाबत जोडप्याने चाैकस असणे गरजेचे आहे. अद्यावत तपासणी आणि उपचार केल्यास निरोगी गर्भधारणा होण्यास मदत होते. - डाॅ. आर. एस. काटकर, आयव्हीएफ तज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्य