शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणच्या "यशवंत बँक" घोटाळा प्रकरणी अनेकांना ‘ईडी’च्या नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:28 IST

१५ ते २० जानेवारी दरम्यान ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावण्यात आले

सातारा : फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी काही दिवसापूर्वीच ईडीच्या पथकाने फलटण, कराड, सातारा येथे संस्थेच्या शाखेमध्ये छापे टाकत चौकशी केली होती. याप्रकरणी एकाला अटक करून त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी संस्थेचे काही कर्मचारी व कर्जदारांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा ईडीने बजावल्या आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.फलटण येथील यशवंत सहकारी बँक अडचणीत आल्यानंतर सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी ही बँक हस्तांतरित करून चालवायला सुरुवात केली होती. मात्र आता या बँकेतच आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार ठेवीदार संघटनेच्या वतीने सहकारी निबंधकांसह ईडीकडे देखील करण्यात आली होती.या तक्रारीची दखल घेत काही दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने फलटण, सातारा, कराड येथील संस्थेच्या शाखेत छापे टाकत चौकशी केली होती. त्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली होती. त्यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. त्यातच गुरुवारी बँकेशी संबंधित काही कर्मचारी व काही कर्जदार यांना ईडीच्या नोटीस हातात मिळाल्या असून त्यांना १५ ते २० जानेवारी दरम्यान ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. त्यामुळे सहकारी संस्था वर्तुळात याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.