पाटण : कोयना धरण परिसरातील भूकंपाची मालिका चौथ्या दिवशीही सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटाने ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरण परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी ४.४ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. त्यानंतर हादऱ्यांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी एक दिवस रिकामा गेला असतानाच शनिवारी सायंकाळी पुन्हा धक्का बसला. या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून ११.२ किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावानजीक आग्नेय दिशेला सहा किलोमीटरवर होते. त्याची खोली नऊ किलोमीटर आहे. चार दिवसांत असे बसले हादरे कोयना धरण परिसरात बुधवारपासून भूकंपाची मालिका सुरू झाली आहे. पहिला धक्का बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी बसला. रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का, तिसरा धक्का गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलचा बसला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला. पाचवा धक्का शनिवारी सायंकाळी बसला.
‘कोयने’त भूकंपाचा पुन्हा धक्का
By admin | Updated: May 22, 2016 00:35 IST