शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Satara- Phaltan Doctor Death: हॉटेलचे डीव्हीआर जप्त, मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:20 IST

घटनाक्रम समोर आल्याने नवे प्रश्न उपस्थित

प्रशांत रणवरे/मुराद पटेलजिंती : फलटण येथील पीडिता डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचे नवीन कंगोरे समोर येऊ लागले आहेत. उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपानंतर हॉटेलमालकांनी पत्रकार परिषद घेऊन सीसीटीव्ही फुटेज दाखविले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यादिवशीचा घटनाक्रम दाखविण्यात आल्याने नव्याने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेच्या तपासकामी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला होता. मग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले कसे? यासह अनेक प्रश्न नव्याने उपस्थित झाले आहेत.फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने व पीडिता राहत असलेल्या घर मालकांचा मुलगा प्रशांत बनकर यांना अटक झाली. त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून माजी खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यासह हॉटेल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने आपली बाजू पत्रकार परिषद घेऊन मांडली.हॉटेल प्रशासनाने घटनेच्या दिवशीचे काही सीसीटीव्ही फुटेज पत्रकार परिषदेत दाखविले. त्यानंतर सदरील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे घटनेच्या तपासाच्यादृष्टीने हॉटेलमधील सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले. मग, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले कसे?असा प्रश्न उपस्थित झाला. या गोष्टीचा तपास फलटण पोलिसांकडून करण्यात येईल का? सीसीटीव्ही फुटेजमुळे आणखी संशयाचे वातावरण तयार झाले असून, डॉक्टर असोसिएशनने या प्रकरणाची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एसआयटी स्थापन करीत तपास करण्याची मागणी केली आहे.

आत्महत्येपूर्वी नेमके काय घडले?आत्महत्या केलेल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या हातावरील मजकुराबाबत बहिणीकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. हस्ताक्षराचा उलगडा हस्ताक्षरतज्ज्ञांच्या अहवालानंतरच होईल. या अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आत्महत्यापूर्वी नेमके काय घडले? याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

हॉटेलमध्ये पीडिता असताना सीसीटीव्ही फुटेज हे त्यांचं ओपन डॉक्युमेंट होतं. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढून घेतले असेल. घटनेनंतर पीडितेला दवाखान्यात घेऊन जाणे, पीएम करणे व गुन्हा दाखल करून घेण्यापर्यंत सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर जप्त झालं नव्हतं. त्यावेळी ते त्यांच्या ताब्यात होते. त्यावेळचे फुटेज त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले असेल, याबाबत मी निश्चित सांगू शकत नाही. एकदा आमच्या ताब्यात डीव्हीआर आल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. - विशाल खांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण

English
हिंदी सारांश
Web Title : Satara-Phaltan Doctor Death: CCTV footage mystery deepens after DVR seizure.

Web Summary : Doctor's suicide in Phaltan sparks controversy. Despite DVR seizure, CCTV footage surfaces, raising questions. Suspicion grows, SIT probe demanded to uncover the truth.