शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

खुनाचा सराव करताना आईच्या जबड्यातून गोळी आरपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:36 IST

नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा सराव करत असतानाच अचानक आई मध्ये आल्याने गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील पळसगाव येथे घडली.

ठळक मुद्देखुनाचा सराव करताना आईच्या जबड्यातून गोळी आरपारखटाव तालुक्यातील पळसगाव येथील खळबळजनक घटना 

सातारा : नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा सराव करत असतानाच अचानक आई मध्ये आल्याने गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील पळसगाव येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगिता फडतरे (रा. पळसगाव, ता. खटाव) या गुरुवारी गोळी लागून जखमी झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह पळसगाव गाठले. पोलिसांनी त्यांचा मुलगा अभिषेक फडतरे याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने माळ्यावर साफसफाई करत असताना आईने बॅगेतून पिस्टल बाहेर काढले. तेव्हा चुकून गोळी सुटून आई जखमी झाली, अशी माहिती त्याने दिली.

पोलिसांनी त्याच्या आईकडे चौकशी केली. त्यावेळी तिनेही मुलगा सांगत असलेली कहाणी सांगितली. मात्र, पोलिसांना दोघांच्या बोलण्यातील तफावतीमुळे संशय अधिक बळावला. पोलिसांनी तपासाचा सर्व फोकस अभिषेक फडतरेकडे केला. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.अभिषेक हा उच्च शिक्षित असून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्याने पुण्यातील मित्राच्या मदतीने धुळे शिरपूर येथून ५० हजार रुपयांना पिस्तूल विकत घेतले.अभिषेकच्या कुटुंबीयांचे पूर्वीपासून जवळच्या नातेवाईकासोबत जमिनीचे आणि घरगुती कारणातून वाद आहेत. त्यामुळे संबंधित नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलून पिस्तूल विकत घेतले होते. खुनाचा सराव तो घरातच करत होता. गुरूवारी सायंकाळी अशाच प्रकारे सराव करत असताना पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर अचानक आई मध्ये आली. त्याने झाडलेली गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेली. यामध्ये आई गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली.जखमी अवस्थेत आईला त्याने खासगी दवाखान्यात नेले. आई गंभीर जखमी असतानाही त्याने आईला पोलिसांना नेमके काय सांगायचे, याची जुजबी माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने आणि हुशीरीपुढे अभिषेकचा थांग  लागला नाही. अखेर त्याला आपल्या कृत्याची कबुली पोलिसांपुढे द्यावीच लागली.पोलिसांनी अभिषेकला अटक केल्याची माहिती पळसगाव परिसरात समजताच खळबळ उडाली. अभिषेकने ज्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यांनाही आपल्यावर जीवघेणा हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली. जमिनीच्या वादातून अभिषेकने नाते रक्तरंजीत करण्याचा डाव आखल्यामुळे जवळच्या नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव, दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड , पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, अर्जून शिरतोडे, अमित माने, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, वडूज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल सरतापे, अजय हंचाटे, सविता वाघमारे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर