शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनो पाणी जपून वापरा, उन्हामुळे कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:08 IST

वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार.

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.सध्या मागील महिन्यापासून जुना व्हॉल्व्ह ऑपरेट न करता सध्या नवीन लाईन सुरू केल्याने शेवटपर्यंतचा एकच नवीन व्हॉल्व्ह सुरू राहणार आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक होता. सद्यस्थितीत तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीपेक्षा एका फुटाने अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.सद्यस्थितीला तलावात केवळ दहा फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत दोन ते तीन इंच वाढ झाली. परिसरात उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतेय...शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणीपातळी सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असून, काही ठिकाणी पात्रातील जमिनीदेखील उघड्या पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतच चालली आहे.

सध्या कास तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा जरी जास्त असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. -जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानWaterपाणी