शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क

By नितीन काळेल | Updated: February 27, 2025 18:16 IST

सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ...

सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ४० अंशाच्या घरात राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात आलाय.जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत चालले आहे. सातारा शहराचा पारा ३६ अंशावर जात आहे. तर पूर्व माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात ३७ ते ३८ अंशापर्यंत पारा राहतोय. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आलेले आहे.

उष्माघाताची कारणे

  • उन्हाळ्यात शेतावर किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये तसेच काच कारखान्यात काम
  • अधिक तापमानाच्या खोलीत काम
  • घट्ट कपड्याचा वापर

उष्माघाताची लक्षणे

  • थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
  • भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणे
  • रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था

प्रतिबंधात्मक उपाय

  • वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे टाळणे
  • कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करणे
  • उष्णता शोषून घेणारे कपडे (काळी किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत
  • सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत
  • जलसंजीवनीचा वापर, भरपूर पाणी प्यावे
  • सरबत प्यावा, उन्हामधील काम अधूनमधून थांबवावे. सावलीत विश्रांती घ्यावी
  • उन्हात बाहेर जातांना चष्मा, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर

उपचार काय ?

  • रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर असावेत.
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न
  • रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, आईस पॅक लावणे
  • आवश्यकतेनुसार सलाईन देणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानhospitalहॉस्पिटल