शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तमाशावरुन कऱ्हाड तालुक्यातील दोन गावांमध्ये धुमश्चक्री, तुफान दगडफेक, वीसहून जास्त जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 13:52 IST

तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण करत साहित्यांची तोडफोड केली. यामध्ये पाच पोलिसांसह वीसहून जास्त जखमी झाले. ही घटना कुंभारवाडी-चाळकेवाडी येथे घडली.

ठळक मुद्देकुंभारगाव-चाळकेवाडीतील वीसहून जास्त जखमीजमावाच्या दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी गंभीर जखमीपाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाची एकमेकांवर तुफान दगडफेक घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण करत साहित्यांची तोडफोड तमाशावेळी नृत्यांगणांना खडे मारण्याचा प्रयत्न

कऱ्हाड ,दि.  ०६ :  तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण करत साहित्यांची तोडफोड केली. यामध्ये पाच पोलिसांसह वीसहून जास्त जखमी झाले. ही घटना कुंभारवाडी-चाळकेवाडी येथे घडली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारगावच्या लक्ष्मीदेवी यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. यात्रेनिमित्त शनिवारी सायंकाळी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशावेळी काही युवकांनी नृत्यांगणांना खडे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांमध्ये बाचाबाची झाली. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. दिवसभर यात्रा सुरळीत पार पडली मात्र सायंकाळी काही युवकांमध्ये पुन्हा हमरीतुमरी झाली. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वादावार तात्पुरता पडता टाकला.

दरम्यान, सोमवारी सकाळी दोन्ही गावांना जोडणाऱ्या  मुख्य रस्त्यावर युवक आमने-सामने आले. त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही गावांतील सुमारे पाचशेपेक्षा जास्त जणांचा जमाव त्याठिकाणी जमला. जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाच्या दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

मारामारी सुरू असताना युवकांचा जमाव कुंभारगावात घुसला. युवकांनी काही घरांमध्ये घुसून तेथील साहित्यांची तोडफोड करीत महिला, मुले व यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केली. या मारामारीत वीसहून अधिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :Policeपोलिसtalukaतालुका