शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पोटच्या मुलांकडून वडिलांना मारहाण, सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:34 IST

सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी स्वत:च्या मुलाकडूनच वडिलांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे पोटच्या मुलांकडून वडिलांना मारहाण, सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी घटनाजखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सातारा: जिल्ह्यात दोन ठिकाणी स्वत:च्या मुलाकडूनच वडिलांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंद्रे ता. सातारा येथील दत्तात्रय मारूती गुजर (वय ६५) हे मुंबई डॉकयार्डमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पेन्शन सुरू आहे. त्यांचा मुलगा रवींद्र (वय ३०) हा नेहमी पैशासाठी तगादा लावत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी रवींद्रने वडिलांकडे खर्चासाठी दोन हजार रुपये मागितले.

हे पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या रवींद्रने झाडूने वडिलांच्या डोक्यात आणि तोंडावर जोरदार फटके मारले. घरात वादावादी झाल्याचे समजल्यानंतर ते साताऱ्यात राहाणाऱ्या आपल्या मुलीकडे आले. परंतु रात्री त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरच हा प्रकार समोर आला.दुसरी घटना कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे घडली. अशोक शंकर घाडगे (वय ७०) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहातात. दोन दिवसांपूर्वी त्यांची डुकरे अचानक मृत पावली. त्यामुळे त्यांनी डुकरांना वीष घालून मारले असल्याचा गावातीलच काही लोकांवर संशय व्यक्त केला.

त्यामुळे चिडलेल्या रवी घाडगे (वय ४०) या मुलाने त्यांच्या डोळ्यावर आणि नाकावर जोरदार बुक्की मारली. त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच डोळ्यालाही मोठी सूज आली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी या दोन्ही घटनांची दखल घेतली असून, त्यांनी दत्तात्रय गुजर आणि अशोक घाडगे यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. हे जबाब त्यांच्या भागातील पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरच संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर