शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:05 IST

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.

ठळक मुद्देटंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना  समस्या निवारणासाठी उचलले पाऊल; दररोज माहिती ठेवावी लागणार

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी पूर्व भागात अपुरा पाऊस पडला. तर पश्चिम भागात धो-धो कोसळूनही सध्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील १८० गावे आणि ७६० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर हजारो पशुधनासाठीही टँकरच्याच पाण्याचा आधार आहे.

असे असतानाच मोठी जनावरे चारा छावणीत असून त्यांच्याबरोबर शेतकरीही घर सोडून राहिला आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेबरोबर समस्याही वाढू लागल्या आहेत. टँकरच्या खेपा वेळेवर येत नाहीत, लोकांना वेळेत पाणी मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच ग्रामस्थांकडून पाण्याबाबत सतत मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी टंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी काम करत असणारे गाव सोडू नये. गावातच मुक्काम करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंततरी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच मुक्काम करणे कमप्राप्त झाले.जिल्ह्यात आज एक हजाराच्या वर ग्रामसेवक कार्यरत आहेत. अनेकांकडे दोन-तीन गावांचा कारभार आहे. तरीही या ग्रामसेवकांना तेथील माहिती ठेवावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्या या सूचनेने ग्रामसेवकांना पाण्याचा टँकर कधी येतो, जातो केव्हा, किती पाणी येते, किती लोकांना मिळाले. पाणी कोठे मिळाले नाही. चांगले पाणी आले आहे का ? अशी सर्व माहिती ठेवावी लागणार आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना अतिशय निकडीची रजा सोडून इतर कोणत्याही रजा मंजूर करण्यात येणार नाहीत. याबाबत गटविकास अधिकाºयांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सूचनांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत आहे. लोकांना वेळेत व चांगले पाणी मिळणे आवश्यक ठरले असून त्यासाठी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पाण्याबाबतच्या काही समस्या असतील तर त्या त्वरीत सोडण्यास मदत होणार आहे.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर