शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:02 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा सातारा जिल्ह्यातील सहा धरणातून अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजासह सातारा, वाई, पाटण, जावळी कऱ्हाड  तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना, वीर, धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये कोयना धरणात ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणातील पाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी १ लाख, ३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वीर धरणातून १ लाख ३ हजार ८०५ क्युसेक तसेच धोममधून १८ हजार, उरमोडीतून ८०००, तारळीतून ८ हजार ९४३, तर कण्हेरमधून १६ हजार ६४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तांबवे-कऱ्हाड  पूल पाण्याखाली गेल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

तांबवे गावाला बेटाचे स्वरुप.

गावातील व्यापारी संकुला पाणी लागले व्यापारी माल बाहेर काढत आहेत. येराड-चिपळूण मार्गावर पाणी आले आले असून ज्योतिबानगरमधील दरड कोसळली आहे. तेथून पन्नास फुटांवरच असलेले घरही खचण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ धोंडी साळुंखे यांच्या कुटुंब अंगणवाडीत हलविले आहे. साजूर गावाशेजारील डोंगरही खचला आहे.

कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील कृष्णाबाई, साई मंदिरात पाणी शिरले आहे. पाटण शहरासह नवीन बसस्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पूर परिस्थिती असली तरी जिल्हा प्रशाासनाने आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

वाईच्या महागणपती मंदिरात सहा फूट पाणीकृष्णानदीला आलेल्या पुराचे पाणी वाईमधील महागणपती मंदिरात शिरले. मंदिरात सहा फूट पाणी साठले आहे. सुरक्षेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे.प्रमुख मुद्दे१. कोयना, कृष्णा दुथडी भरुन२. तांबवेतील दहा गावे संपर्कहिन३. प्रतिसंगमावरील मंदिरात पाणी४. पाटण तालुक्यातील येराड येथील वीज खांब पाण्याच्या प्रवाहाने हालत आहे.५. येराडमध्ये दरड पडली, घराला धोका; दोन कुटुंबांचे स्थलांतरलोकांच्या स्थलांतराला प्राधान्यपाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सुमारे ७०० कुटुंबे स्थलांतरीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याबरोबरच रहिमतपूर - सातारा आणि कोरेगाव - सातारा हे रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर