शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल, अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:15 IST

rian, sataranews सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल ! अनेक गावांचा संपर्क तुटला

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात गुरूवारी सहाव्या दिवशीही परतीचा पाऊस सुरू होता. पण, बुधवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जोर कमी होता. गुरुवारी सकाळपासून कधी उघडीप तर कधी पाऊस पडत होता. त्यातच ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शनही होत होते. मात्र, बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच होता. यामुळे गावोगावचे ओढे खळाळू लागले आहेत. तर माणगंगा नदीला पूर आला आहे.बुधवारच्या पावसामुळे कांदा, भुईमूग, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक भागात तोडणीस आलेला उसही भुईसपाट झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातच या पावसामुळे खटाव तालुक्यातील मायणी गावाचा संपर्क तुटला. तेथील दोन्ही पुलावर पाणी आले. तर तात्पुरता असणारा एक पूल वाहून गेला. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले.माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील पुलावरही पाणी आले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद पडलेली. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे.कोयनेच्या सहा दरवाजातून विसर्ग...जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार असल्याने सर्वच प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढला. त्यामुळे बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. गुरुवारीही विसर्ग सुरूच होता. सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर यावर्षी जूनपासून कोयनानगर येथे ४४५२ आणि नवजाला ५१६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह २१०० आणि सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून त्यातून ३२१११ असा ३४२११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ३५१५ क्यूसेक, कण्हेर ३५६६, उरमोडी ४००, तारळी ३६४१, भाटघर ३५००, निरा देवघर ७०० आणि वीर धरणातून सर्वाधिक ५३३४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.महाबळेश्वरला १२६ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सरासरी ८३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दुष्काळी माण, खटाव तालुक्यात प्रत्येकी ८४, फलटण तालुक्यात ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ८ पर्यंत तालुकानिहाय झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे.

सातारा - ८३.८५, जावळी - ६८.१२, पाटण - ६९.६४, कºहाड - १००.६९, कोरेगाव - ५७.८९, खटाव - ८४.१७, माण - ८४, फलटण - ९४.३३, खंडाळा - ९२.९५, वाई - ७२.४३ आणि महाबळेश्वर तालुका - १२२.७५. दरम्यान, महाबळेश्वर येथे २४ तासांत १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा ठरला.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर