शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औंध परिसरातील शेतकऱ्यांनी मिटवला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, मुरघास बनवण्याकडे कल; कसा बनतो मुरघास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 18:52 IST

रशीद शेख औंध : खटाव तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे ...

रशीद शेखऔंध : खटाव तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये ६० ते ६५ टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चाऱ्यावर होतो. तसेच उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध करताना शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. सर्वच शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने आता मुरघास बनवण्याकडे शेतकरी वळला असल्याचे चित्र दिसत आहे.असा बनतो मुरघासहिरवा चारा म्हणजे ग्रामीण सगळीकडे मका पिकाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. योग्यवेळी मका कापून बंदिस्त व हवाबंद मोठ्या पिशवीत कुट्टी करून साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रकिया घडून येतात. आंबविलेल्या चाऱ्यातील पोषणमूल्यामध्ये काहीही घट न होता चारा स्वादिष्ट आणि चवदार बनतो. यालाच मुरघास म्हटले जाते.पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंदमुरघासासाठी चारा फुलोऱ्यात असतानाच कापणी करतात. मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः ६० टक्के ओलावा लागतो. चारा सुकल्यावर कुटीच्या साह्याने त्याचे अर्धा ते एक इंचापर्यंत बारीक तुकडे केले जातात व प्रकियेसाठी मोठ्या पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंद ठेवले जातात. त्यानंतर तो जनावरांना घालण्यास सुरुवात करीत असतात.जनावरांना बाराही महिने हिरवा चारा देणे शक्य नसते. त्यामुळे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविणे आवश्यक आहे. दूध उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे दूध उत्पादन न घटता नियमित मिळायला हवे असेल, तर त्यांना रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक असल्याने मुरघासाचा उपाय आहे.दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून..मुरघास कोणत्याही हंगामात बनविता येते. उन्हाळ्यात मुरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय, जनावरांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते. तसेच चाऱ्याची बचत होते.

औंध परिसरात सर्रास शेतकरी मुरघासाचा वापर करीत आहेत. मुरघास बनवून ठेवला की, रोजच्या रोज चारा आणण्याच्या कामाची व वेळेची बचत होते. कुट्टी करून मुरघास बनवत असल्याने चाऱ्याची नासाडी थांबविणे शक्य होते. -अतुल पवार, गोपूज

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी