शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी जोडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:50 IST

पारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक पवार यांचा अजनुज जवळील कडजाई धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला धरणातून पाईपलाईन जोडण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशोक दत्तू पवार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देजलवाहिनी जोडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू पारगावात शोककळा : पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

खंडाळा : पारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक पवार यांचा अजनुज जवळील कडजाई धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला धरणातून पाईपलाईन जोडण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशोक दत्तू पवार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, धरणाच्या आत सायफन पद्धतीने ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणी सोडण्यासाठी अशोक पवार बुधवारी दुपारी साडेतीन वाजता धरणाजवळ गेले होते. त्यांच्यासोबत इतरही कर्मचारी होते.

पाण्यामध्ये पाईप सोडत असताना पवार यांचा तोल गेला व ते पाण्यात पडले. त्यानंतर ते बाहेर आलेच नाहीत. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेऊन शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते हाती लागले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.घटनास्थळी माहिती मिळताच खंडाळा तालुका मदत व बचाव पथक, खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शोध कार्य राबविल्या त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस स्थानकामध्ये झाली असून या संदर्भात अधिक तपास खंडाळा पोलिस करत आहेत.दुष्काळाच्या झळापारगावच्या पाणीपुरवठयाची विहीर अजनुज गावच्या हद्दीत आहे. या विहिरीला उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणी कमी पडते. त्यामुळे दरवर्षी कडजाई धरणातून पाईपद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. याच कामासाठी कर्मचारी गेले असता एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर