शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी माळरानातील कूपनलिकांना फुटला पाझर

By admin | Updated: September 6, 2016 23:43 IST

देऊरला चमत्कार : तालुक्याच्या उत्तर भागात झाली जलयुक्तची जलक्रांती

संजय कदम -- वाठार स्टेशन कायम दुष्काळी भाग असा शिक्काच नशिबी बसलेला कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग गेली कित्येक वर्षे हक्काच्या पाण्यासाठी लढतोय या भागासाठी सिंचन योजना घोषित झाल्या मात्र गेली १८ वर्षे झाले तरी त्या अजूनही अपुऱ्याच राहिल्यामुळे ‘पाणी’ या शब्दाचाच विसर पडलेला; परंतु यापैकी देऊर गाव त्याला अपवाद ठरले आहे. दुष्काळाचा अनुभव सहन करत असलेले कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर हे गाव! या गावच्या पूर्वेस पावसाचे नेहमीच दुर्भिक्ष असल्याने आजही गावच्या पूर्व भागाची परिस्थिती पाण्याअभावी बिकट आहे. मात्र, गावचा पश्चिम भाग व वसना नदी काठ आणि डोंगरालगतचा भाग हा जलयुक्तच्या कामांमुळे जलमय झाला आहे. जलयुक्त, पाणलोट या कामाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत गावच्या पश्चिम भागातील डोंगर भागात अनेक कामे पूर्णत्वास आली, याचा आज लाभ आज या परिसरातील देऊर-भांडेवाडी शिवारात झाला आहे. या भागात अडवलेले पाणी आता कूपनलिकेतून आपोआपच ओसांडून वाहत आहे. गावातील मनोज कदम या शेतकऱ्याने ४ वर्षांपूर्वी शेतीसाठी आपल्या शेतात ३०० फूट खोल कूपनलिका खोदली होती. ही कूपनलिका उन्हाळ्यात अगदी जेमतेम पाणी देत होती, मात्र आज हीच कूपनलिक ा आपोआप वाहू लागली आहे. यामधून जवळपास ५ हॉर्स पॉवरच्या मोटरचे पाणी २४ तास वाहत आहे. यामुळे या बोअरवेल भोवतीच एक तळे साचले आहे. या परिसरातील डोंगरभागात झालेल्या पाणलोट कामांमुळे हे शक्य झाले. मागील दोन वर्षांतील परिस्थिती बघितली तर या भागातला असणारा पाणीसाठाही खालावला गेला होता. सर्वच विहिरी कोरड्या पडल्या होत्या, असणारे पाझर तलावही कोरडेच होते; पण शेती व पिण्याची तहान भागवण्यासाठी ३०० ते ५०० फुटांपर्यंत या भागात कूपनलिका खोदून शेतीची तहान भागवण्याचा मोठा प्रयत्न या भागातल्या शेतकऱ्यांनी केला परंतु जमिनीतच पाणी नसल्याने ते कूपनलिकेत तरी येणार कोठून येणार असाच प्रश्न या भागातल्या शेतकऱ्यांना पडला होता. अशा भयाण दुष्काळात पाण्याविना रोजच जगणेच असाह्य झाल्यामुळे अनेक शेतकरी शेतशिवारातच पाण्याच्या शोधात राहू लागले होते. दुष्काळामुळे कामकाज ठप्प झाले होते, अशी परिस्थिती असताना शासन मात्र गावच्या डोंगरात कुठतरी खड्डे घेत होत काही ठिकाणी चाऱ्या तर काही ठिकाणी मातीच्या ताला टाकत होत अनेकवेळा गावकऱ्यांना या गोष्टीच हसू वाटायचे, यात काय होणार? असा प्रश्न गावकरी या शासकीय अधिकाऱ्यांना विचारत होते. मात्र, शासनाने आपले टार्गेट पूर्ण करीत संपूर्ण डोंगरभागात चर आणि तलाव निर्माण केले. गतवर्षी यामध्ये जलयुक्त शिवार ही नवी संकल्पना शासनाने राबवली यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अनेक बंधारे गावोगावी निर्माण झाले दुष्काळ हा शब्द पुसण्यासाठी शासनाबरोबरीने दिग्गज कलावंत मंडळीही माळरानातून पाणी चळवळ उभारण्यासाठी समोर आली जलक्रांतीसाठी मोठा उठाव गेल्या वर्षभरात कोरेगाव तालुक्यात झाला. या लढ्यात गावोगावचे शेतकरीही एकोप्याने समोर आले. श्रमदानातून संपूर्ण गावकरी शेतशिवारात वेड्यासारखी राबू लागली अनेक बंधारे निर्माण झाले या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाणी फांउडेशनसारखी संस्था गावोगावी शासनाला बरोबर घेऊन कार्यरत झाली.शासनाचा एका बाजूने हा खटाटोप सुरू असतानाही जून संपला तरी पाऊस मात्र पडत नसल्याने शेतकऱ्यांनी या वर्षीही पाण्याची आशा सोडली होती; परंतु जुलै महिन्यात अगदी काही दिवसच पडलेल्या पावसाने निर्जीव पाझरतलाव सजीव केले. वसना नदीपात्रात सोळशी ते पळशीपर्यंतचे जलयुक्तमधील २७ बंधारे एकाच दिवसात ओसंडून वाहू लागले या पाण्याने दुष्काळी जनतेचे चैतन्य निर्मान झाले. आज फक्त जिकडेतिकडे या पाण्याचीच चर्चा हे दुष्काळ ग्रस्त करत आहेत ते केवळ जलयुक्त शिवार या संकल्पनेमुळेच.