कर्मचारी संघटनांच्या संपामुळे सातारा : जिल्'ात कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 07:47 PM2020-01-08T19:47:05+5:302020-01-08T19:48:59+5:30

केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप केला. या संपामध्ये बहुतांश कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यालये ओस पडली होती.

Due to the collapse of the staff unions the offices become dewy | कर्मचारी संघटनांच्या संपामुळे सातारा : जिल्'ात कार्यालये ओस

सातारा येथे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने केली.

Next
ठळक मुद्देविविध संघटना आंदोलनात ; बहुजन क्रांतीचा नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध

सातारा : जिल्'ात बुधवार ‘आंदोलन डे’ ठरला. विविध कामगार संघटनांनी शासनाच्या धोरणाच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे शासकीय कार्यालये ओस पडली. विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको केला तर बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप केला. या संपामध्ये बहुतांश कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यालये ओस पडली होती. सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाºयांना मसुद्यातील दरांमध्ये सर्व परिमंडळांतील श्रेणीतील कर्मचाºयांच्या मूळदरांमध्ये सरसकट दरमहा पाच हजार रुपयांची वाढ करून अधिसूचना जाहीर करावी, ग्रामपंचायत कर्मचा-यांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामंपचायत कर्मचाºयांनी सुमारे दोन तास निदर्शने करून धरणे आंदोलन केले.

वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी संपाची हाक देण्यात आली होती.

राज्य कर्मचारी, बँक, पोस्ट, बीएसएनएल, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. या आंदोलनात आशा वर्कर्स, अंगणवाडी, बांधकाम कामगार व अन्य संघटनांनी सहभागी घेतला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्ता रोको केला. शेतकºयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शेतकºयांनी सुमारे पंधरा मिनिटे रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. कर्जमाफी, शेतीपंप, वीजबिल, दुधाला योग्य भाव मिळावा, अशा शेतक-यांच्या मागण्या आहेत. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले. नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करत बहुजन क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शन केली.
 

 

 

Web Title: Due to the collapse of the staff unions the offices become dewy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.