शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

कृष्णा, कण्हेर, उरमोडीच्या पेटलेल्या पाण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा उतारा; अधिकाऱ्यांना केल्या सूचना 

By नितीन काळेल | Updated: November 21, 2023 18:39 IST

सिंचनच्या पाण्यासाठी साताऱ्यातील शेतकरी आक्रमक

सातारा : जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली असून पाणीप्रश्न पेटू लागला आहे. यावरुनच सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करुन सिंचन भवनात आंदोलन केलेले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत कृष्णा, उरमोडी नदीवरील सातारा तालुक्यातील बंधारे भरुन देण्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केली आहे.जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असून धरणांतही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध भागातून धरणांमधील पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटू लागलाय. कृष्णा, उरमोडी नदी आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी आक्रमक पवित्रा घेत साताऱ्यातील कृष्णानगरच्या सिंचन विभागात दोनवेळा ठिय्या आंदोलनही करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आलेले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरीही उपस्थित होते.या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली, माहिती घेतली. त्यानंतर जिल्ह्यात टंचाईची स्थिती आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागत आहे. तरीही कोणावर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे. यासाठी जलसंपदा विभागानेही नियमबाह्य पध्दतीने पाणी सोडू नये. असे कोणी केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृष्णा आणि उरमोडी नदीतील बंधारे पाण्याने भरुन देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे पाणी प्रश्नावर तात्पुरतातरी पडदा पडला आहे.या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव सांळुखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, बाबासाहेब घोरपडे, राजू घाडगे, विकास घोरपडे, दिपक सांवत, गजानन देशमुख, धनाजी घाडगे, धोम संघर्ष समितीचे सी. आर. बर्गे, रणजित फाळके, नंदकुमार पाटील, मोहन जाधव, झेले-पाटील व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी