शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चालक धाकात; गाडी स्थानकात..!

By admin | Updated: December 2, 2014 00:26 IST

उंब्रजमध्ये कारवाई : ७५ वाहनांकडून दहा हजार रुपये दंड वसूल

उंब्रज : उंब्रज बसस्थनकात एसटी येण्यासाठी उंब्रज ग्रामपंचायत व उंब्रज पोलिसांनी राबविलेला उपक्रम आज (सोमवारी) शंभर टक्के यशस्वी ठरला; परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक एसटी गाड्या बसस्थानकात न जाता महामार्गावरच थांबत असल्यामुळे पोलिसांना एसटीवरही दंडात्मक कारवाई करावी लागली. दिवसभरात ७५ वाहनांकडून जवळपास दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.सोमवारी सकाळपासून पोलिसांनी क्रेनच्या साह्याने उपमार्गावर उभी केलेली वाहने उचलण्यास सुरुवात केली. ही वाहने थेट उंब्रज पोलीस ठाण्यात नेली जात होती. दुचाकी वाहनांकडून २०० रुपये तर चारचाकी वाहनांकडून पाचशे रुपये दंड घेतला जात होता. दिवसभर ही क्रेन पोलिसांसह उपमार्गावरून फिरत होती. यामुळे पूर्ण उपमार्ग रिकामा झाला होता. ज्या एसटी गाड्या बसस्थानकात येत होत्या, त्या विना अडथळ्याच्या सुसाट जात होत्या.व्यापारी, ग्रामपंचायत व पोलिसांकडून आजपासून एसटी बसस्थानकात या मोहिमेला साथ मिळत असताना अनेक एसटीचे चालक एसटी बसस्थानकात आणण्याबाबत टाळाटाळ करत होते. यामुळे महामार्गावर उभ्या केलेल्या एसटीवर पोलिसांनी ‘नो पार्किंग’ची कारवाई केली. यावेळी एसटी चालक व पोलीस यांच्यात तू-तू मै-मै ही झाल्याचे दिसून येत होते; परंतु पोलिसांनी कडक भूमिका घेत संबधित एसटी चालकांवरही दंडात्मक कारवाई केली. (प्रतिनिधी)मोहिमेबद्दल समाधानउंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दिवसभरात ७५ वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई अशीच एसटी महामंडळानेही आगाराच्या चालकांना सूचना देऊन एसटी बसस्थानकात आणण्याबाबत सांगावे, अशी मागणी उंब्रजकरांच्या वतीने होत आहे.उंब्रज ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. व्यापाऱ्यांना स्वत:हून पुढे येऊन आपली अतिक्रमणे काढली आहेत. परंतु, काही अतिक्रमणे अजूनही राहिली आहेत, तीही काढून घ्यावीत. यामुळे या चांगल्या कामाला सहकार्य होईल.- सुधाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य उंब्रज पोलिसांनी उपमार्गावर राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक वर्षांनी उपमार्ग रिकामा दिसला. आता एसटी महामंडळानेही आपल्या चालकांना कडक सूचना देणे गरजेचे आहे, म्हणजे हा उपक्रम पूर्ण यशस्वी होईल. - विकास जाधव