शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रियाच्या धाडसामुळे वाहनचालक ताब्यात -: शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:12 IST

सातारा : सातारा-पुणे खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या सुप्रिया भोसले हिने दाखवलेल्या धाडसामुळे अपघात करून पळून जाणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात ...

ठळक मुद्देशिरवळजवळ अपघात

सातारा : सातारा-पुणे खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या सुप्रिया भोसले हिने दाखवलेल्या धाडसामुळे अपघात करून पळून जाणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत शिरवळ परिसरात चर्चा सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील सुप्रिया भोसले या एका खासगी गाडीने पुण्याकडे प्रवास करत होत्या. गाडी शिरवळपासून पुढे नीरा नदीच्या पुलावर पोहोचल्यानंतर त्या प्रवास करत असलेल्या गाडीनेच समोरून जाणाºया दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की गाडीवरील दाम्पत्य रस्त्याच्या कडेला पडले. त्यांच्यासोबत तीन-चार वर्षांचे बाळ असल्याचेही सुप्रियाने पाहिले.

‘आपल्या गाडीने त्यांना उडवलंय. तुम्ही गाडी बाजूला घ्या, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे,’ असं वारंवार सांगूनही ड्रायव्हरने याकडे दुर्लक्ष करत गाडी गडबडीने पुढे नेली. या गाडीचे पासिंग झाले नसल्यामुळे त्यावर नंबर नव्हता. या संधीचा फायदा घेऊन ड्रायव्हर गाडी पुढे नेत असल्याचा अंदाज आल्यानंतर सुप्रियाने भाऊ जीवन जाधव यांच्याशी संपर्क साधून या प्रसंगाविषयी माहिती दिली. जीवन यांनी तिला पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचा नंबर देऊन संपर्क साधण्याचं सांगितलं.

पोलीस निरीक्षक घनवट यांच्याशी संपर्क होईपर्यंत गाडीने टोलनाका गाठला नव्हता. घनवट यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर टोलनाक्यावरच गाडी अडविण्याची तयारी केली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गाडी बाजूला घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती.दोघा जखमींवर शिरवळमध्ये उपचार सुरूया अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या हातापायाला मार लागला आहे. तर तिच्या पतीला किरकोळ जखम झाली आहे. त्यांच्यासोबत असणाºया त्यांच्या लहान बाळालाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुप्रिया भोसले हिच्या प्रसंगावधानामुळे अपघात घडविणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

गाडीत पहिल्याच सीटवर बसल्याने मला समोर घडलेला हा अपघात पाहता आला. गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत करण्याचं ड्रायव्हरला सांगितलं तर त्याने याकडे दुर्लक्ष केलं. छोटं लेकरू सोबत घेऊन प्रवास करणाºया या जोडप्याला चांगलाच मार लागलाय.- सुप्रिया भोसले, प्रवासी, सातारामी ज्या गाडीतून प्रवास करतेय ती गाडी दुचाकीला धडक देऊन तशीच पुढं आली आहे, असा फोन अनोळखी नंबरवरून आला. याविषयी तातडीने महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासनाशी संपर्क साधून ती गाडी खेड शिवापूर टोलनाक्यावर अडवली.- पद्माकर घनवट,पोलीस निरीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात