शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

केवळ गैरसमज नको... वस्तूस्थिती पण पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. पण ही उक्ती केवळ कागदावर राहते. रक्तदानाबाबत काहींना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. पण ही उक्ती केवळ कागदावर राहते. रक्तदानाबाबत काहींना उत्सुकता असते परंतु त्याभोवती असलेले गैरसमज आणि भीती यामुळे अनेकजण त्यापासून दूर राहतात. म्हणूनच तुमच्या मनातून रक्तदानाबाबतचे हे काही गैरसमज दूर करा आणि रक्तदानासाठी एक पाऊल पुढे या.

अनेकांच्या मनामध्ये रक्तदान करताना त्रास होतो, असा मोठा गैरसमज आहे. मात्र, रक्तदानाच्या दरम्यान सुईचा वापर केला जातो. ती हातावर टोचली जाते मात्र हा त्रास क्षणिक असतो. त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. आणखी एक गैरसमज तो म्हणजे रक्तदानानंतर आरोग्य बिघडते, थकवा येतो. पण यामध्ये तथ्य नाही. उलट एका संशोधनानुसार, रक्तदान केल्यानंतर कार्डियोव्हसक्युलर आजारांचा धोका कमी होतो. शरिरात अतिरिक्त आयर्न साचून राहण्याचा धोका कमी होतो. रक्तदानापूर्वी दात्याची चाचणी केली जाते. ज्यामधून वैद्यकीय धोके, हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते. दात्याचे हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅम परसेंटपेक्षा कमी असेल किंवा अन्य व्याधींचे निदान झाल्यास तुम्ही रक्तदान करण्यास पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे हाही गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. बऱ्याचदा अनेकांकडून म्हटले जाते, रक्तदानानंतर शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. मात्र, असे कदापी होत नाही. रक्तदान केल्याने शरिरात मूळीच त्याची कमतरता निर्माण होत नाही. रक्तदानानंतर ४८ तासांत ती झीज भरून निघते. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास आणि संतुलित आहार घेणार्‍या व्यक्ती दर तीन महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून चारवेळेस रक्तदान करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे कोणतेही गैरसमज बाळगू नयेत. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो, यासारखे समाधान आयुष्यात कोणतेच नाही. त्यामुळे रक्तदानासाठी हिरिरीने प्रत्येकाने सरसावले पाहिजे.

चाैकट : आपल्या मनातील हे आहेत ‘बोल’

गैरसमज : माझा रक्तगट विशेष नाही. त्यामुळे माझ्या रक्तदानामुळे फारशी मदत होईल, असे मला वाटत नाही.

वस्तूस्थिती : सतत शस्त्रक्रिया, अपघातानंतरच्या उपचारांमध्ये रक्ताची गरज भासते. त्यामुळे विशेष रक्तागटासोबतच सामान्य रक्तगटाचीदेखील गरज सातत्याने भासते.

गैरसमज : रक्तदानानंतर दिवसभर आराम करणे गरजेचे आहे.

वस्तूस्थिती : रक्तदानानंतर काही वेळातच तुम्हाला पुन्हा काम करण्याची मुभा दिली जाते. मात्र, त्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

रक्तदानानंतर २४ तासांमध्ये किमान १०-१२ ग्लास पाणी किंवा इतर द्रव्यपदार्थ घ्यावेत.

रक्तदानानंतर २-३ दिवस मद्यपान टाळा.

रक्तदानानंतर ३-४ तास वाहन चालवणं, फार काळ उन्हात राहणे, धुम्रपान करणे टाळा.

गैरसमज : रक्तदानानंतर लठ्ठपणा वाढतो.

वस्तूस्थिती : रक्तदानाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. प्रमाणापेक्षा अधिक खाऊन व्यायाम न केल्यास वजन वाढू शकते.

गैरसमज : मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे मी रक्तदान करू शकत नाही.

वस्तूस्थिती : रक्तदानाच्या वेळेस तुमचा रक्तदाब १८० ते १००पेक्षा कमी असल्यास तुम्हाला ती संधी दिली जाते. तुम्ही रक्तदाबावर घेत असलेल्या गोळ्यांवर काहीवेळेस हे अवलंबून असते.

गैरसमज : मला मधुमेहाचा त्रास असल्यास मी रक्तदान करू शकत नाही.

वस्तूस्थिती : डॉक्टरांच्या मते, मधुमेहीदेखील रक्तदान करू शकतात. परंतु, रक्तदानाच्या वेळेस तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये असणे आवश्यक आहे.

गैरसमज : रक्तदान करण्याइतका मी तरूण नाही.

वस्तूस्थिती : रक्तदान करण्यासाठी किमान वयाचे बंधन असले तरीही कमाल वयाचे काहीच बंधन नाही. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास तुम्हाला रक्तदान करण्याची परवानगी आहे.

गैरसमज : रक्तदानामुळे एचआयव्हीचा धोका वाढतो.

वस्तूस्थिती : रक्तदानादरम्यान स्टरलाईझ केलेल्या सुया वापरल्यास रक्तातून पसरणार्‍या इन्फेक्शनचा धोका नक्कीच कमी होतो. एकच सुई परत वापरली जात नाही. त्यामुळे निश्चितच हा धोका नाही.