शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

वंचित जातीत संघर्ष नको; सरसकट ओबीसी आरक्षण देणे शक्य नाही - भारत पाटणकर 

By नितीन काळेल | Updated: November 9, 2023 15:57 IST

जातीयवादी धर्मांधशक्तीच शत्रू 

सातारा : आरक्षण गरीब-श्रीमंतीचा मुद्दा नाही. तर जातीय शोषणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित जातींत संघर्ष होणे दुःखद बाब आहे. कारण सर्व शोषित जातींचा खरा शत्रू जातीयवादी धर्मांध शक्तीच आहे. त्यातच आता १९८१ पासून कुणबी नोंद असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाला असल्याने बाहेरील कोणीही ओबीसीत घुसडण्याचा प्रश्नच येणार नाही. तसेच सरसकट ओबीसी आरक्षण देणेही शक्य नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. पाटणकर बोलत होते. यावेळी विजय मांडके उपस्थित होते. डाॅ. पाटणकर म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी तीन प्रकारात कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे. कोरडवाहू शेती करणारे कुणबी, बागायत शेती करणारे ते माळी कुणबी आणि शेती तसेच मेंढपाळी करणारे धनगर कुणबी होय. तर १८८१ च्या जनगणनेचा उल्लेख करीत १८८४ च्या मुंबई प्रेसिडेन्सीच्या गॅजेट्समध्ये प्रत्येक जिल्ह्याची जातवार विभागणी दिली आहे. त्यात काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची वेगळी लोकसंख्या दिली आहे. तर सातारा जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या दिली. पण, मराठा घटकाची संख्या वेगळी दिलेलीच नाही. मात्र, सर्वच गॅझेटसमध्ये (हैद्राबाद धरून) इतर सर्व जातींची संख्या नोंदलेली आहे. आज उच्चजातीय ९६ कुळी मराठा जातीचे म्हणवणाऱ्यांनी कुणबी नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच कुणबी आरक्षणाला नकार दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातीलही उच्चजातीय ९६ कुळी मराठा व्यक्तींनी एकत्र येऊन तसा ठरावच केला आहे. सातारा जिल्ह्यातील उच्चजातीय ९६ कुळी मराठा यांनीही मुख्यमंत्र्यांना याच प्रकारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे पूर्वीपासून (१८८१ ) कुणबी आहेत. त्यांचेच रेकॉर्ड शोधून तेवढ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे मराठा म्हणवणाऱ्यांना ओबीसीमधून आरक्षण नकोच आहे. मराठा म्हणवणाऱ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातूनच ठरणार आहे.कुणबी जात म्हणून नोंद पूर्वीपासूनच्या दप्तरात नाहीत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे बाहेरचे कोणी ओबीसीमध्ये घुसडण्याचा प्रश्न येणारच नाही, असे सांगून डाॅ. भारत पाटणकर पुढे म्हणाले, ‘सर्व जिल्ह्यांतील कुणबी शोध पडताळणी संपली की हा प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आंदोलन फक्त उच्च जातीय ९६ कुळी मराठा समाज यांच्या पुरते आणि न्यायालयात लढण्याचेच शिल्लक राहू शकते. या कारणाने ओबीसी जातींनी आज तरी संघर्ष करण्याचा मुद्दा उरलेला नाही. मराठा उच्चजातीयांनी आता ओबीसीमधे समाविष्ट करण्याची मागणी न करता ५० टक्क्यांबाहेर मराठा विशेष आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना आता संघर्ष करण्याचे कारण उरलेले नाही. कुणबी नसलेली एकही व्यक्ती आता आरक्षणात घुसण्याचा प्रश्नच निकालात निघालेला आहे.

पत्रकार परिषदेत दिलेली १९८१ च्या जणगणनेनुसार जातनिहाय लोकसंख्येची माहिती.सातारा जिल्हाकुणबी ५,८३,५६९माळी २४,५३९धनगर ४१,५४७

सोलापूरमराठा-कुणबी १,८००००माळी २,४००धनगर ५७,७०४

कोल्हापूरकुणबी २,९९,८७१माळी १,४०७मराठा ६२,२८७धनगर ३८,३२६

टॅग्स :Satara areaसातारा परिसरreservationआरक्षण