शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या अड्ड्यावर छापा, तीन रिक्षांसह साहित्य ताब्यात

By संजय पाटील | Updated: October 10, 2023 11:19 IST

महसूल, पोलिसांनी पहाटेच टाकली धाड

कऱ्हाड : घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनात भरून देणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्चेनजिक एका खोलीत हा बेकायदेशीर अड्डा चालविला जात होता. त्याठिकाणी पोलीस तसेच महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकून तीन रिक्षांसह इतर साहित्य जप्त केले. संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शहरातील कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू होता. गत अनेक महिन्यांपासून संबंधितांकडून हा उद्योग केला जात होता. याबाबतची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. दररोज अनेक रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या घरगुती गॅस भरला जात होता. याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार व पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. यावेळी काही रिक्षाही त्याठिकाणी आढळून आल्या असून एक गॅस वाहतूक करणारे वाहनही घटनास्थळावर गॅसच्या टाक्यांसह आढळून आले आहे. घटनास्थळावर सध्या संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस