शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

डोंगरात डोलतोय उसाचा तुरा !

By admin | Updated: April 7, 2015 01:31 IST

सुशिक्षित युवकाचा यशस्वी प्रयोग : जेसीबीने फोडला खडक, साडेतीन हजार फूट पाईपलाईन

पोपट माने - तळमावले -शिकलेला माणूस शेती पासून दूर जातो, असे म्हणतात; पण बोरगेवाडी, ता. पाटण येथील एका सुशिक्षित युवकाने जिद्द, चिकाटी बाळगून कष्टाच्या जोरावर माळरानावर एक एकर शेत तयार करून उसाचे चांगले उत्पादन घेतले आहे. कुंभारगावपासून जवळच असलेल्या बोरगेवाडी येथील युवक राजेंद्र बोरगे याचे ‘दरा’ नावाचे पूर्ण पडीक असलेले माळरान होते. या माळरानावर काहीही पीक उगवत नव्हते. या माळरानावर ऊसशेती करण्याचा विचार करून राजेंद्र बोरगे या युवकाने जेसीबी मशीन भाडेतत्त्वावर आणून संपूर्ण रानातील खडक बाजूला काढून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले. गावाजवळच असलेल बंधाऱ्यातील गाळ स्वखर्चाने काढून त्या शेतात टाकला. याला सुमारे एक लाख वीस हजार रुपये खर्च झाला. शेतीला पाणी देण्यासाठी बोरगे यांनी ओढ्याच्या कडेला असलेल्या विहिरीवर वीजपंप बसवून सुमारे साडेतीन हजार फूट पाईपलाईन करून या माळरानावरील शेतात नेले. या पाईपलाईनला दीड लाख रुपये खर्च झाला. यासाठी बोरगे यांना कर्ज काढावे लागले. परंतु बोरगे यांनी ऊसशेती करण्याचा जणू चंगच बांधला होता. या शेताची मशागत करून शेणखत टाकून सरी सोडून ०३१.०२ या जातीच्या उसाचे बियाणे आणून त्याची लागण केली; पण संपूर्ण ओसाड असलेल्या या माळरानावर दुसऱ्या कसल्याही प्रकारचे पीक नसल्याने जनावरांचा उपद्रव होऊ लागला. त्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतीला तारेचे कुंपण घातले.प्रत्येक ऊस सुमारे दोन किलोचाया शेतात लागण केलेला ऊसही चांगला जोमात आला असून, एका उसाचे वजन सरासरी दोन किलोच्या आसपास आहे. या एक एकरात साधारणपणे साठ ते सत्तर टन उसाचे उत्पादन मिळेल, अशी बोरगे यांना अपेक्षा आहे. मला लहानपणापासून शेतीची आवड आहे. परंतु शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. कुंभारगाव विभागात चाळकेवाडी येथे झालेल्या तलावामुळे ओढ्यासह ओढ्याच्या आजूबाजूच्या विहिरीत पाणीसाठा होऊ लागला त्यामुळे उसासारखे पीक घ्यायचा निर्णय घेतला.- राजेंद्र बोरगे, शेतकरी