शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर

By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 22:53 IST

Crime news Of Karad, Satara: कराडमधील नामांकित डॉक्टरसह दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, संशयित डॉक्टरने अश्लील व्हिडिओ पंजाबमधील मित्राकडून तयार करून घेतल्याचे समजते

- प्रमोद सुकरे 

लोकमत न्यूज नेटवर्क कराड : कराड येथे 'एआय' चा घातक वापर करुन महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हाट्सअप वर व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे कराडच्या वैदिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीच्या किलेक्शन थेरपी सेंटर विरोधात विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्याबद्दलची पाहणी करून आरोग्य विभागाला निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून आरोपी डॉ. राजेश शिंदे याने 'एआय'च्या माध्यमातून २ महिला डॉक्टरांसह चौघांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक समोर येत आहे. 

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराड शहरातील दोन महिला डॉक्टरांसह एका तरूणी आणि एका तरूणाचा अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपीने हे कृत्य का केले? याचीही माहिती आता समोर येऊ लागली आहे. कराड शहराच्या पूर्वेकडे संशयित आरोपी राजेश शिंदे यांचे किलेक्शन थेरपी सेंटर आहे. तेथील उपचारा संदर्भात काही संघटनांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल देण्याची सूचना शासकीय वैद्यकीय सूत्रांना केली होती. त्यानुसार समक्ष थेरपी सेंटरची पाहणी केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले त्यानुसार संबंधित तपासणी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल आरोग्य विभागाकडे पाठवला. या सर्व घटनेचा राग मनात धरून डॉ. राजेश शिंदे याने २ महिला डॉक्टरांसह एक तरुणी आणि एका तरुणाचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवला. 

डॉ. राजेश शिंदे याने पंजाबमधील त्याच्या परिचयाच्या विकास शर्मा याला सदर व्हिडिओ पाठवले. तसेच या संबंधित डॉक्टरांचे नंबर्स पाठवून व्हाट्सअप ग्रुप तयार करायला सांगितला. त्या ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शर्मा याने डॉक्टर राजेश शिंदे यांच्या सांगण्यावरून शेअर केले अशी माहिती तपासात समोर येत आहे. 

याप्रकरणी कराडमधील नामांकित डॉक्टरसह दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, संशयित डॉक्टरने अश्लील व्हिडिओ पंजाबमधील मित्राकडून तयार करून घेतल्याचे समजते

टॅग्स :doctorडॉक्टरMolestationविनयभंग