शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

धक्कादायक! वृद्धाच्या पोटात चक्क जिवंत २० गोगलगाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:26 PM

दूषित पाण्यातून पोटात गेली अंडी

सातारा : सातारा तालुक्यातील करंडी येथील जगन्नाथ महादेव जाधव या ८० वर्षीय वयोवृद्धाच्या पोटात चक्क दूषित पाण्याद्वारे अंडी गेल्याने तब्बल २० हून अधिक जिवंत गोगलगाई त्यांच्या पोटात आढळल्या. या अजब घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.जगन्नाथ जाधव यांना काही दिवसांपासून जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील डॉ. विक्रांत महाजनी यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शौचाद्वारे गोगलगाई बाहेर आली. त्यांनी हा प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची सोनोग्राफी केली असता, त्यांच्या पोटामध्ये वीसहून अधिक जीवंत गोगलगाई असल्याचे निष्पन्न झाले. आश्चर्य म्हणजे या वयोवृद्धाच्या पोटातील गोगलगाई विना शस्त्रक्रियाद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पोटामध्ये गोगलगाईचे विष पसरल्याने त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. याला वैद्यकीय क्षेत्रात ‘इंटरस्ट्रीशियल नेफ्रिटीस’असे म्हटले जाते. त्यामुळे जाधव यांना डायलेसिस करावे लागत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.मुसळधार पावसात गावात दूषित पाणी पुरवठा होत होता. या परिसरातील अनेकांना गॅस्ट्रोची लागणही झाली होती. त्यातच ही घटना समोर येताच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत पाणी पुरवठा करणारी टाकी, पाईपलाईन गळती व गावात स्वच्छता केली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाणी उकळून पिण्याच्या सूचना ग्रामस्थांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.