शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाइकाकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:22 IST

तासभर कामबंद आंदोलन : रुग्णाशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप

फलटण : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अविनाश गायकवाड यांना मंगळवारी रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच डॉक्टरला मारहाण झाली. यामुळे रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ काही वेळ कामबंद आंदोलनही करण्यात आले.याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात मंगळवारी सकाळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामात मग्न असतानाच गोंधळ सुरू झाला. सोमवारी तपासणी केलेल्या रुग्णाचा नातेवाईक सकाळी अकराच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात आला. त्याने डॉ.अविनाश गायकवाड यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारहाण केली.सोमवारी तपासणी केलेल्या रुग्णास वापरलेली भाषा योग्य नसल्याच्या कारणावरून संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाने थेट डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा जाहीर निषेध करत, सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील काम बंद ठेवत निषेध केला. दरम्यान, या घटनेची व गुन्ह्याची फलटण शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती, अशी माहिती फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.रुग्णसेवा देताना अडचणी...फलटण उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी यावर त्वरित बंदोबस्त व प्रतिबंध करा अथवा हे रुग्णालयच दुसरीकडे हलवा अशी मागणी केली. रुग्णसेवा देत असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत असल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केला.विधानसभेत प्रश्न अन् फलटणला मारहाणफलटण येथील डॉक्टर आत्महत्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मंगळवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिले. त्याच वेळी फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टराला मारहाण करण्यात आली. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor assaulted at Phaltan hospital in Satara; staff protest.

Web Summary : A doctor at Phaltan sub-district hospital was assaulted by a patient's relative. This incident sparked outrage and a temporary work stoppage by hospital staff, highlighting concerns about safety after a recent doctor suicide case.